टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:25 PM2019-05-02T14:25:14+5:302019-05-02T14:27:06+5:30

: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Take care to supply pure water from tankers: Santosh Dhotre | टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

संतोष धोत्रे यांनी भाटकी येथील जनावरांच्या चारा छावणीत दुष्काळी जनतेशीही संवाद साधला.

googlenewsNext
ठळक मुद्देटँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या : संतोष धोत्रेमाण तालुक्यातील पाणी टंचाईचा घेतला आढावा

म्हसवड : टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या.
माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ जनतेला योग्य पद्धतीने मिळतोय का? याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मंगळवारी माण तालुक्याचा दौरा केला.

ढाकणी, पिंगळी खुर्द आणि पिंगळी बुद्रुक या तीन फिडिंग पॉर्इंटमधून टँकरमध्ये पाणी भरले जाते. तब्बल ७० टँकरमध्ये या फिडिंग पॉर्इंटमधून पाणी घेतले जाते. जनतेला पाणी पुरविण्याआधी ते योग्य प्रकारे शुद्ध करण्यात यावे. याबाबत शासकीय यंत्रणेने तपासणी करावी, तसेच टँकरच्या जेवढ्या खेपा मंजूर आहेत, तेवढ्या रोजच्या रोज झाल्या पाहिजेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना धोत्रे यांनी यावेळी केल्या. टँकरमधून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धताही त्यांनी तपासली.

यानंतर भाटकी (ता. माण) येथील जनावरांच्या छावणीत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीतील पाणी व्यवस्था, चारा, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा याची पाहणी त्यांनी केली. या छावणीमध्ये १ हजार २३ जनावरे असल्याची माहिती मिळाली. जनावरांना योग्य चारा, पाणी मिळते का? अशी विचारणा त्यांनी शेतकºयांना केली. दुष्काळी उपाययोजना राबविताना अडचणी येऊ देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दुष्काळग्रस्तांशी साधला संवाद

संतोष धोत्रे यांनी भाटकी येथील जनावरांच्या चारा छावणीत दुष्काळी जनतेशीही संवाद साधला. लोकांकडून दुष्काळाची तीव्रता त्यांनी जाणून घेतली. यावेळी लोकांनी दुष्काळामुळे हतबलता वाढल्याचे सांगितले. शासनाने टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Take care to supply pure water from tankers: Santosh Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.