पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:11 PM2018-03-18T23:11:16+5:302018-03-18T23:11:16+5:30

Subway road excavation at Powai nose | पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे खोदकाम

पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे खोदकाम

Next

सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-मुंबईच्या धरतीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. एकूण १ हजार २३० मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरसाठी तब्बल ४९ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पोवई नाका सर्कल येथे १०० मीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे खोदकाम हाती घेण्यात आले आहे. लवकरच कामात अडथळा ठरणाºया जलवाहिन्या जीवन प्राधिकरणच्या सहकार्याने काढण्यात येणार आहेत.
आठ रस्ते एकत्र जोडणाºया पोवई नाका परिसरातून दररोज सुमारे २ लाख ७१ हजार ४५० वाहने ये-जा करतात. शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा ताण याच ठिकाणी पाहावयास मिळतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर (उड्डाणपूल) उभारण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.
शिवाजी सर्कलजवळ खोल चर खोदून पहिल्या टप्प्यात लॉ कॉलेज ते तहसील कार्यालय या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात कोल्हापूरकडे जाणाºया रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी तब्बल ४९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मार्ग निधीतून हे काम केले जात असून, दोन वर्षांत ते पूर्णत्वास येणार आहे.
पोवई नाका येथे केल्या जाणाºया भुयारी मार्गाची लांबी ३३० मीटर असणार आहे. कोल्हापूर, कास, अदालत वाडा रोड व बसस्थानकातून येणारी वाहने याच भुयारी मार्गातून ये-जा करणार आहेत. एकूण वाहतुकीपैकी ४५ टक्के वाहतूक स्थानिक नागरिकांची असल्याने ती ग्रेड सेपरेटरवरील सिग्नलद्वारे होणार असून, वाहतुकीचा ताण पूर्णत: कमी होणार आहे.
महाडचा पूल बांधणाºया कंपनीकडून निर्मिती
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ३ आॅगस्ट २०१६ रोजी वाहून गेला होता. या पुलाच्या शेजारीच तातडीने नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुणे येथील टी. अँड. टी प्रा. लि. या कंपनीमार्फत या पुलाची उभारणी करण्यात आली. याच कंपनीने साताºयातील ग्रेड सेपरटेचे काम हाती घेतले आहे.
असा असणार सेपरेटर
तहसील कार्यालय (बसस्थानक मार्ग) ते कोल्हापूर बाजूकडील रस्त्याची लांबी ४८० मीटर तर तहसील कार्यालय ते पंढरपूर बाजूकडील रस्त्याची लांबी २३० मीटर आहे. कास-अदालत वाडा मार्ग ते तहसील कार्यालय या रस्त्याची लांबी ५२० मीटर इतकी आहे. या ठिकाणीच ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. याची एकूण लांबी १ हजार २३० मीटर तर रुंदी ५.५० मीटर इतकी असणार आहे.
पाणी निचºयासाठी पाईपलाईन
ग्रेड सेपरेटरच्या बाजूला सेवा रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी २०० मीटर लांबीची स्वतंत्र पाईपलाईन बसविली जाणार आहे. सेपरेटरचे पूर्णपणे क्रॉँक्रिटीकरण केले जाणार आहे.

Web Title: Subway road excavation at Powai nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.