अपघातानंतर भेदरलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांना रयतसेवकांचा आधार!

By Admin | Published: January 13, 2016 12:07 AM2016-01-13T00:07:33+5:302016-01-13T01:08:37+5:30

भुर्इंज : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडून चहा-नाष्टा

Students on the trip after the accident riotsevak support! | अपघातानंतर भेदरलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांना रयतसेवकांचा आधार!

अपघातानंतर भेदरलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांना रयतसेवकांचा आधार!

googlenewsNext

भुर्इंज : अजंठा वेरुळला १४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या दोन गाड्या मंगळवारी सकाळी भुर्इंज हद्दीत आली. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण... दंगा, मस्ती सुरू असतानाच अचानक गाडीला ब्रेक लागला. काय झाले पाहण्यासाठी काही शिक्षक खाली उतरले. पाहतात तर अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजले. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी चांगल्याच घाबरल्या. यांना भावनिक आधार देण्यासाठी भुर्इंज येथील रयतसेवक धावून आले.
याबाबत अधिक माहिती अशी, वाळवा शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील विद्यामंदिर विद्यालयाच्या १४० विद्यार्थ्यांना घेऊन राज्य परिवहन महामंडळच्या दोन गाड्या अजंठा वेरुळकडे निघाल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोर सुदाम तुकाराम वाघमारे (वय ६५, रा. पिराचीवाडी, ता. वाई) या सायकलस्वारास एका बसची ठोकर बसली. या घटनेत वाघमारे हे जागीच ठार झाले.
या घटनेने दोन्ही बसमधील विद्यार्थी आणि शिक्षक चांगलेच घाबरून गेले. अपघाताची माहिती मिळताच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी धावले. अपघातग्रस्त बस पोलीस ठाण्यात नेणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना कोठे थांबवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. प्राचार्य पाटील यांनी तातडीने निर्णय घेत सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देत विद्यालयात आणले.
रयत सेवकांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होण्यास मदत झाली. मदन भोसले यांच्या प्रयत्नातून दुसरी बस उपलब्ध झाल्यानंतर दोन्ही बसनंतर अजंठा वेरुळकडे रवाना झाल्या. दरम्यान, या मदतीबद्दल वाळवा शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले. याशिवाय सर्व विद्यार्थ्यांनीही आर. एस. पाटील यांना ‘थँक्यू सर’ म्हणतच पुढील प्रवासाला सुरुवात केली. (प्रतिनिधी)


थंडीत वाफाळलेला चहा
आधीच थंडीने कुडकुडणाऱ्या व अपघाताने भांबावलेल्या या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्राचार्य पाटील यांनी चहा व नाष्ट्याची सोय केली. दुसरी बस येईपर्यंत विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत रयत शिक्षण संस्थेचे सदस्य भय्यासाहेब जाधवराव यांनीही शाळा व्यवस्थापनाला सूचना केल्या.

Web Title: Students on the trip after the accident riotsevak support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.