पराभवाच्या भीतीनेच माढ्यातून शरद पवारांनी पळ काढला - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:48 AM2019-05-27T04:48:19+5:302019-05-27T04:48:44+5:30

माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी पळ काढला होता.

Sharad Pawar ran away from the pothole - Chandrakant Patil | पराभवाच्या भीतीनेच माढ्यातून शरद पवारांनी पळ काढला - चंद्रकांत पाटील

पराभवाच्या भीतीनेच माढ्यातून शरद पवारांनी पळ काढला - चंद्रकांत पाटील

Next

फलटण (जि.सातारा) : माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी पळ काढला होता. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयाने हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. फलटण येथील विजयी सभेत मंत्री पाटील बोलत होते. आपला माणूस खासदार झाला, याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तुम्ही सर्वांनी गेली महिनाभर केलेलं कष्ट फळाला आलंय. तुमच्या सर्व अपेक्षा सरकार पूर्ण करणार आहे. माढामधून पुन्हा शरद पवार जरी उभे असते तरीही ते पराभूत झाले असते, असा दावाही चंद्रकांतदादांनी केला.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, बारामतीची चाकरी आणि लाल दिव्यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नेहमीच फलटण तालुक्यावर अन्याय केलाय. त्यांचे स्वार्थी राजकारण यापुढे चालू देणार नाही. आमची लढाई रामराजेंशी नव्हे तर हत्तीबरोबर म्हणजे बारामतीकरांशी आहे.’
‘मी फलटण तालुक्यात मतांसाठी फिरलो नाही. लोकांना मुक्तपणे मतदान करू द्या, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु रामराजेंनी लोकांना धमकावून मते मागितली. संस्थेतील कर्मचाऱ्यांना बदली करेन, काढून टाकेन, असे धमकावून कामे करायला सांगितली,’ अशी टीकाही रणजितसिंह यांनी केली.
>बारामतीचे पाणी बंद करणार!
काहीही संबंध नसताना फलटण आणि माळशिरस तालुक्याचे हक्काचे नीरा-देवघर कालव्याचे पाणी बारामतीकर पळवून नेत होते. ते पाणी एक महिन्यात पुन्हा फलटणकडे कायमस्वरुपी वळविणार असून, माढा लोकसभा मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविणार असल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
>काँग्रेसचे आमदार मिरवणुकीत
या विजयी मिरवणुकीत काँग्रेसचे माणचे आमदार जयकुमार गोरे हे सहभागी झाले होते. तसेच माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, उत्तमराव जानकर, माजी आमदार बाबूराव माने, डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, नरसिंह निकम हे ही कार्यक्रमास उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar ran away from the pothole - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.