पाण्यासाठी शामगावकारांचा पंधरा किलोमीटर चालत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:56 PM2019-06-20T14:56:04+5:302019-06-20T14:57:20+5:30

टेंभू योजना शामगाव हद्दीतून जात असून शासनदरबारी या योजनेतून पाणी वाटपाचा वापर कमी दिसत आहे. शासनाकडून तो दिला जात नाही. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी शामगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांनी शामगाव ते कऱ्हाड असे पायी चालत आक्रोश मोर्चा काढला.

Shamogakara's fifteen kilometers running front for water | पाण्यासाठी शामगावकारांचा पंधरा किलोमीटर चालत मोर्चा

पाण्यासाठी शामगावकारांचा पंधरा किलोमीटर चालत मोर्चा

Next
ठळक मुद्देपाण्यासाठी शामगावकारांचा पंधरा किलोमीटर चालत मोर्चाप्रशासनाच्या कारभाराचा निषेध : टेंभू योजनेतुन हक्काच्या पाण्याची मागणी

कऱ्हाड : टेंभू योजना शामगाव हद्दीतून जात असून शासनदरबारी या योजनेतून पाणी वाटपाचा वापर कमी दिसत आहे. शासनाकडून तो दिला जात नाही. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी शामगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांनी शामगाव ते कऱ्हाड असे पायी चालत आक्रोश मोर्चा काढला.

यावेळीं मोठया संख्येने महिला, युवक, ग्रामस्थ मोर्च्यांत सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे अश्या घोषणा आक्रमक झालेल्या महिला व ग्रामस्थानी दिल्या.

Web Title: Shamogakara's fifteen kilometers running front for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.