साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:29 PM2019-05-02T14:29:02+5:302019-05-02T14:29:41+5:30

सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे ...

Satara gambling, raid on liquor and arrested five; Action started | साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापापाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच



सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अभिमान जालिंधर ओव्हाळ (वय ४२), युवराज (आण्णा) जाधव (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) विष्णू शिवाजी कांबळे, राहुल अंकुश गंगावणे (वय ३५, रा. परळी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील युवराज जाधवचा दोन्ही अड्ड्यावर सहभाग होता. याबाबत अधिक माहिती अशी, औद्योगिक वसाहतीमध्ये एक पत्र्याच्या आडोशाला जुगार खेळताना पोलिसांनी अभिमान ओव्हाळ आणि युवराज जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ हजारांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याच ठिकाणी सुरू असणाºया दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी विष्णू कांबळेसोबत याच कारवाईमध्ये पुन्हा युवराज जाधवला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार २७६ किमतीच्या देशी दारूच्या एकूण ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. सातारा शहर पोलिसांनी या दोन्ही कारवाई केल्या.
तिसरी कारवाई सातारा तालुका पोलिसांनी परळी, ता. सातारा येथे केली. परळी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असणाºया दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण १३ बाटल्या जप्त केल्या. यावेळी पोलिसांनी राहुल गंगावणे याला ताब्यात घेतले. या तिन्ही कारवाया पोलिसांनी महाराष्ट्रदिनी केल्या.

Web Title: Satara gambling, raid on liquor and arrested five; Action started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.