सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:02 PM2018-05-03T17:02:40+5:302018-05-03T17:02:40+5:30

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्यान, त्याचवेळी तहसीलदार सुनील बेलेकर यांनी कामाच्यास्थळी येऊन पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Satara: The fingers of the trumpet are going to work | सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान

सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान

Next
ठळक मुद्देटायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदानएक दिवस दुष्काळाविरोधातपाचवड येथील कामाची तहसीलदारांकडून पाहणी

मायणी : दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्यान, त्याचवेळी तहसीलदार सुनील बेलेकर यांनी कामाच्यास्थळी येऊन पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी गाव म्हणून ओळख असणाऱ्या पाचवड ग्रामस्थांनी दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी श्रमदान हाती घेतला आहे. श्रमदान कार्यक्रमांसाठी विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या संघटना या ठिकाणाहून प्रत्यक्ष श्रमदान करत आहेत. मायणी येथील खासगी क्लासचा सुमारे पन्नास विद्यार्थी-विद्यार्थिनींनी येऊन श्रमदान केले.

तहसीलदार सुनील बेलेकर यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन करून शासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गावाबाहेर व्यवसायानिमित्त असणारे लोक गावासाठी आर्थिक मदत करत आहेत अशा ग्रामस्थांचे कौतुक केले.

नालाबांध अन् पाझर तलावही गाळमुक्त

येथील शेकडो ग्रामस्थ दररोज सकाळी तीन तास श्रमदान करीत आहे. तर नाम फाउंडेशनमार्फत देण्यात आलेल्या जेसीबी मशीनद्वारे येथील नैसर्गिक ओढे, नाले यांचे खोलीकरण व रुंदीकरण ही करण्यात येत आहेत. तसेच येथील जुने नालाबांध व पाझर तलावातील गाळ काढणे सुरू आहे.
 

Web Title: Satara: The fingers of the trumpet are going to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.