सातारा : शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:04 PM2018-05-07T12:04:01+5:302018-05-07T12:04:01+5:30

नागठाणे रस्त्यावरून कारमधून जाणाऱ्या चालकास अडवून शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Satara: The demand for ransom, abduction and assault | सातारा : शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी, तिघांना अटक

सातारा : शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी, तिघांना अटक

Next
ठळक मुद्दे शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणीतिघांना अटक, बोरगाव पोलिसांनी केली कारवाई

सातारा : नागठाणे रस्त्यावरून कारमधून जाणाऱ्या चालकास अडवून शिवीगाळ व मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मयूर मुकुंद कांबळे (वय २८, रा. विसावा नाका, सातारा), नरेंद्र रवींद्र बर्गे (२९, रा. नागठाणे) व विनायक राजाराम पवार (२९, पाडळी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, संजय बबन पवार (४३, रा. विलासपूर, सातारा) हे कारमधून नागठाणे येथे जात असताना सोमवारी दुपारी चार वाजता मयूर काबंळे याने स्वत:ची दुचाकी रस्त्यात आडवी पाडली.

नरेंद्र बर्गे, विनायक पवार यांनी गाडीचे नुकसान झाल्याचे सांगून पाच हजार रुपये भरपाई दे, नाही तर जीवे मारीन, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
 

Web Title: Satara: The demand for ransom, abduction and assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.