काऊदºयात रंगली निसर्गपूजा : वनदेवी मानून महिलांना साडी, तुळशीचे रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:02 AM2018-02-24T01:02:47+5:302018-02-24T01:03:25+5:30

Presented in the Kaud region, the presence of devotees in the form of nirvad puja: Allocating saris, Tulsi seedlings to the women as an anvil | काऊदºयात रंगली निसर्गपूजा : वनदेवी मानून महिलांना साडी, तुळशीचे रोपांचे वाटप

काऊदºयात रंगली निसर्गपूजा : वनदेवी मानून महिलांना साडी, तुळशीचे रोपांचे वाटप

googlenewsNext

पाटण : तालुक्यातील मणदुरे येथील पठारात असलेल्या काऊदºयावर पुणे, सातारा, पाटण, तारळ तसेच जेजुरी येथून आलेल्या भाविक व निसर्गप्रेमींनी शुक्रवारी सकाळी निसर्गपूजा केली. यावेळी गुलाल आणि भंडाºयाची उधळण करण्यात आली. वनसंपत्तीचे जतन करून संवर्धन करा, ‘झाडे लावा झाडे जगवा,’ असा संदेश देत निसर्गाला नारळ अर्पण करण्यात आला.
पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, यादवराव देवकांत यांच्या हस्ते भंडारा व गुलालाची उधळण करत जेजुरी येथील जानाईदेवीच्या शेकडो भाविक, भक्तांसह मणदुरे परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत निसर्गपूजा करण्यात आली.
सभोवताली होणाºया जंगलतोडीमुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गाने दिलेल्या देणगीचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी झाडांचे संवर्धन केले पाहिजे, असे अवाहन जेजुरी येथून आलेले भाविक देतात.
यावेळी अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी चोळी व तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. निसर्गपूजेनंतर पालखीचे निवकणे मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. या पालखीचा निवकणे येथे तीन दिवस मुक्काम असतो.
मानवासाठी निसर्गाने कायम भरभरून दिले आहे. पण अति हव्यासापोटी निसर्गाची हानी मानवाकडून होते. निसर्गसौंदर्य जतन करायचे असल्यास तालुक्यातील प्रत्येक डोंगरदरीत राहणाºया लोकांनी निसर्गाची पूजा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: Presented in the Kaud region, the presence of devotees in the form of nirvad puja: Allocating saris, Tulsi seedlings to the women as an anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.