पिस्तूलाची तस्करी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:07 AM2018-09-18T00:07:38+5:302018-09-18T00:07:42+5:30

Pistol smuggler arrested | पिस्तूलाची तस्करी करणाऱ्यास अटक

पिस्तूलाची तस्करी करणाऱ्यास अटक

Next

कºहाड : परदेशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी कºहाडात घेऊन आलेल्या बारामतीच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील स्टेशन रोडलगत कॅफे विहार हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
इंद्रजित माणिक सोनावणे (वय १९, रा. वाघज, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एक युवक कºहाडात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विशेष पोलीस पथकातील उपनिरीक्षक शेलार, सहायक फौजदार राजेंद्र राऊत, हवालदार बी. आर. जगदाळे, अरुण दुबळे, संतोष चव्हाण, आसिफ इनामदार, प्रवीण पवार, संदीप पवार, रामदास तुंबडे, इम्रान पटेल, सागर बर्गे, विजय माने, सौरभ कांबळे, रमेश बरकडे, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक स्टेशन रोडवरील कॅफे विहार हॉटेलजवळ पोहोचले. काही वेळात एक युवक त्याठिकाणी आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस पथकाने त्याला हटकले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इंद्रजित सोनावणे असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे देत त्याने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्याला तत्काळ अटक करून उपअधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. कºहाड शहर पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pistol smuggler arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.