पाटणच्या मतदारांचा कौल भूमिपुत्राला का राजेंना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:41 PM2019-04-26T23:41:03+5:302019-04-26T23:41:08+5:30

अरुण पवार । लोकमत न्यूज नेटवर्क पाटण : पाटण विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले असले तरी ...

Patna voters Kawal Bhumibhutra's Rajnea? | पाटणच्या मतदारांचा कौल भूमिपुत्राला का राजेंना?

पाटणच्या मतदारांचा कौल भूमिपुत्राला का राजेंना?

Next

अरुण पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : पाटण विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले असले तरी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना ‘फाईट’ देणारा उमेदवार म्हणून पाटणच्या नरेंद्र पाटील यांना भूमिपुत्र म्हणून पाटण तालुक्यातून जादा मताधिक्य मिळणार, असे संकेत मतदान पार पडल्यानंतर दिसून येत आहेत.
पाटण मतदार संघात ३९७ मतदान केंद्रावर सरासरी ६० टक्के मतदान झाले. कºहाड तालुक्यातील तांबवे, साजूर, केसे, पाडळी, वसंतगड, साकुर्डी येथील मतदान केंद्राचा पाटण विधानसभा मतदार संघात समावेश होता. पाटण तालुक्यात आमदार शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दोन गटांचे प्राबल्य आहे. शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या नरेंद्र पाटील यांना पाटणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांची पूर्णपणे साथ मिळाल्याचे चित्र मतदानाविषयी दिसले. याउलट राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी पाटणला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणावे तितक्या उत्साहात दिसून आले नाहीत. त्यातच सध्या यात्रा, लग्न सराई यांचा सिझन असल्यामुळे मुंबई आणि पुणे येथील तरुण युवक वर्ग मोठ्या संख्येने पाटण तालुक्यात उपस्थित आहे.
मुंबईकर हे साहजिकच शिवसेनेकडे आकर्षित असल्यामुळे नरेंद्र पाटील यांना अशा तरुणांचा मतदानासाठी फायदा झाला असल्याचे दिसते. पाटण शहरात सुमारे १५ हजार मतदान आहे. येथे झालेल्या मतदानापैकी बहुतांशी मतदान उदयनराजे भोसले यांच्या पारड्यात पडेल. मात्र, कोयनानगर, मोरगिरी, ढेबेवाडी आणि मल्हारपेठ या विभागातील मतदान केंद्रावर शिवसेनेच्या उमेदवारास जादा पंसती मिळणार असल्याचे चित्र दिसून आले. कारण वरील विभागात आमदार शंभूराज देसाई आणि शिवसेना, भाजप असे समीकरण नरेंद्र पाटील यांना लाभदायक ठरणार आहे.
ढेबेवाडी, कुंभारगाव, सणबूर, तळमावले या परिसरात शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनाच मतदार सहानुभूती दाखवतील, असे वातावरण मतदानादिवशी पाहावयास मिळाले. बंधू रमेश पाटील हे जरी नरेंद्र पाटील यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहावयास मिळाले तरी नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा त्यांचा प्रभाव मोठा नाही. हेच दिसून आले.
तारळे विभागातूनही भाजपचे रामभाऊ लाहोटी आणि आमदार शंभूराज देसाई यांचा गट नरेंद्र पाटील यांच्यासाठी झटताना दिसत होता. उदयनराजे भोसले यांना पाटणमधून दरवेळेसारखे मताधिक्य मिळवून देण्यासाठी यावेळेस जबाबदारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर
यांच्याकडे होती. सत्यजित पाटणकर यांनी मतदानादिवशी काही मतदान केंद्रावर भेटी दिल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांना पाटणमधील चाफळ, म्हावशी, मणदुरे, चाफोली, आणि कोयना विभागातील पूर्वेकडील गावामधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणून मताधिक्य मिळेल. कारण
या परिसरात सत्यजित पाटणकर यांचे प्राबल्य आहे. त्यातच विक्रमबाबा पाटणकर यांनीसुद्धा शेवटच्या क्षणी का होईना उदयनराजे भोसले यांना मतदान करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.

Web Title: Patna voters Kawal Bhumibhutra's Rajnea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.