पंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:13 PM2019-02-05T13:13:52+5:302019-02-05T13:15:44+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याच्या कबुली जबाबाने पोलिसांची डोकी अक्षरश: चक्रावली आहेत. माझ्यात अजमल कसाब घुसला आहे. त्या भूमिकेत मी गेलोय. त्यामुळे माझ्याकडून ही पोस्ट टाकली गेलीय, अशी हास्यास्पद माहिती तो पोलिसांना देत आहे.

Pankaj says Ajmal Kasab has entered into me | पंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलाय

पंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलाय

googlenewsNext
ठळक मुद्देपंकज म्हणतोय माझ्यात अजमल कसाब घुसलायमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढविण्याचा सल्ला

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याच्या कबुली जबाबाने पोलिसांची डोकी अक्षरश: चक्रावली आहेत. माझ्यात अजमल कसाब घुसला आहे. त्या भूमिकेत मी गेलोय. त्यामुळे माझ्याकडून ही पोस्ट टाकली गेलीय, अशी हास्यास्पद माहिती तो पोलिसांना देत आहे.

मुंबई येथील नालासोपारा येथून पंकजला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. तू ही पोस्ट सोशल मीडियावर का टाकली? अशी विचारणा पोलिसांनी त्याच्याकडे केली. त्यावेळी त्याने काही गंभीर तर काही मजेशीर किस्से पोलिसांना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे जाहीर सभा होती. या सभेवेळी मी मोबाईलचे कव्हर विकण्यासाठी तेथे गेलो होतो. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदून अनेकजण जात होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका संभावू शकतो, असे मला वाटले. माझ्यात अजमल कसाब घुसला. त्या भूमिकेत मी गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाचे बरे-वाईटची धमकी मी दिली.

मुख्यमंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा कमी आहे, हे तू चांगल्या मार्गाने सांगू शकला असतास, असे पोलिसांनी त्याला विचारले. पंकज म्हणाला, मी अतिरेकी असल्यासारखे काहीक्षण मला वाटले. त्यामुळेच हा प्रकार माझ्या हातून घडला. अशा प्रकारची संदर्भहीन उत्तरे तो देत असल्यामुळे पोलीसही हतबल होत आहेत. सध्या पंकजवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Web Title: Pankaj says Ajmal Kasab has entered into me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.