माणदेशी महोत्सवाचे उद्यापासून सातार्‍यात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:29 PM2017-11-21T23:29:05+5:302017-11-21T23:29:25+5:30

Organized by the Mandi Festival on Saturdays in Satara | माणदेशी महोत्सवाचे उद्यापासून सातार्‍यात आयोजन

माणदेशी महोत्सवाचे उद्यापासून सातार्‍यात आयोजन

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवार, दि. २३ ते सोमवार, दि. २७ नोव्हेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सवाचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माण, खटाव तसेच सातारा जिल्ह्यातून महिला व शेतकरी यांचा मोठा सहभाग या महोत्सवात असणार आहे. दि. २३ रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन सोहळा अभिनेत्री अमृता सुभाष, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते होईल.
यावेळी महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. यशस्वी देशी उद्योजिकांच्या यशोगाथा व त्यांचे वास्तव अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अपूर्व संधी २५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी चार वाजता माणदेशी उद्योजिका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ऐकायला मिळणार
आहे.
सिनेअभिनेत्री निवेदिता सराफ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७ माणदेशी उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी २०० मुलींना मोफत सायकल वाटप केले जाणार आहे.
२६ नोव्हेंबर रोजी दुर्गेश नंदिनी प्रस्तुत ‘गजर महाराष्ट्राचा’ हा लोककला व लावणीचा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्हा परिषद व माणदेशी फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व
आरोग्य सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४ नोव्हेंबर व
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा
ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजन केले आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: Organized by the Mandi Festival on Saturdays in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.