आता तिन्ही सभापती दक्षिणचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:07 AM2019-06-21T00:07:12+5:302019-06-21T00:09:04+5:30

विधनासभेला ‘लढायचं नक्की; पण कसं ते नेत्यांनी ठरवावं,’ असं उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन जाहीर केलंय. माजी मंत्री विलासराव पाटील यांची राजकीय खेळी तर त्या दृष्टीनेच नेहमी सुरू असते. नुकतीच कºहाड तालुका शेती उत्पन्न

Now all three seats are south! | आता तिन्ही सभापती दक्षिणचे !

आता तिन्ही सभापती दक्षिणचे !

googlenewsNext

प्रमोद सुकरे ।
कºहाड : विधनासभेला ‘लढायचं नक्की; पण कसं ते नेत्यांनी ठरवावं,’ असं उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन जाहीर केलंय. माजी मंत्री विलासराव पाटील यांची राजकीय खेळी तर त्या दृष्टीनेच नेहमी सुरू असते. नुकतीच कºहाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महादेव देसाई यांची झालेली निवड त्याचाच भाग म्हणावा लागेल.

कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघाचे सलग सातवेळा प्रतिनिधित्व केले आहे. गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवून दक्षिणेतून काँगे्रसच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. मात्र, बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढलेल्या विलासराव पाटील-उंडाळकरांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांनाही विजयापासून दूरच राहावे लागले.

गत चार-साडेचार वर्षांत कºहाड दक्षिणच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पृथ्वीराजबाबा आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. तर विलासराव पाटील-उंडाळकर माजी आमदार बनले आहेत. डॉ. अतुल भोसले पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद भूषवित असल्याने राज्यमंत्री झाले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिणच्या फडात या तिघांच्याही व्यूहरचना सुरू आहेत.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या फंडातून दक्षिणेत विकासकामांवर जोर दिलाय. तर डॉ. अतुल भोसले यांनीही सरकारमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात मतदार संघात विकास निधी आणला आहे. मात्र, असे असले तरी राजकीय मुत्सद्दीपणामुळे तालुक्यातील सर्वच महत्त्वाच्या संस्थांवर विलासराव पाटील-उंडाळकरांची पकड मजबूत असून, त्या माध्यमातून लोकांची कामे करून आपली नाळ त्यांनी कायम ठेवली आहे.

कºहाड दक्षिणच्या फडात काँगे्रसचे उमेदवार कोण? भाजपचे उमेदवार कोण? हे योग्यवेळी स्पष्ट होईलच; पण विलासराव पाटील यांचे वारसदार अ‍ॅड. उदयसिंह पाटील या रिंगणात नक्की असणार, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आता कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार, हे मात्र त्यांचे त्यांनाच माहिती.

अडीच वर्षांची वाटणी फायद्यात
कºहाड पंचायत समितीत सध्या विलासराव पाटील-उंडाळकर व उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता आहे. सुरुवातीलाच अडीच वर्षांसाठी सभापतिपद हे बाळासाहेब पाटील समर्थकांना देण्यात आले; पण त्यानंतर वर्षभरापूर्वी अडीच वर्षांच्या सभापतिपदाची संधी उंडाळकर गटाला मिळाली. त्यावेळी उंडाळे खोºयातील येळगावच्या फरिदा इनामदार यांना त्यांनी सभापतिपद दिले. याचा फायदा विधानसभेला व्हावा, हीच त्यामागची अटकळ मानली जाते.
 

कार्वेच्या थोरातांनाही ‘लॉटरी’
कºहाड तालुका खरेदी-विक्री संघात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांची एक हाती सत्ता आहे. येथेही दीड वर्षापूर्वी सभापतिपदात बदल करत कºहाड दक्षिणमधील कार्वेच्या रंगराव थोरात यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. तर कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघात उपसभापतिपद दिले आहे. हे फेरबदलही विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच केले आहेत, हे निश्चित.

कलेच्या देसार्इंना संधी
कºहाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीत विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गटाची सत्ता आहे म्हणे; पण इथं फक्त उंडाळकरांचेच चाललेले पाहायला मिळते. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कºहाड उत्तरमधील असणाºया सभापतींचा राजीनामा घेऊन दक्षिण मतदार संघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाºया काले गावातील महादेव देसाई यांना नुकतीच सभापतिपदाची संधी दिली आहे. आता राजकीय समतोल साधताना उत्तरेतील संचालकांना उपसभापतिपद दिले जाईल, अशी चर्चा आहे.

कोयना बँकेतही दक्षिणराज!
विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाºया कोयना बँकेतही ‘दक्षिण’राज पाहायला मिळतेय. शेणोलीचे रोहित पाटील त्याचे अध्यक्षपद भूषवित आहेत. तर कºहाड शहरातील विजय मुठेकर यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची धुरा अ‍ॅड. उदयसिंह पाटील स्वत: सांभाळत आहेत. तर दक्षिणेतील येणके गावचे अप्पासाहेब गरूड कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

Web Title: Now all three seats are south!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.