नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:41 PM2017-10-17T23:41:31+5:302017-10-17T23:41:34+5:30

Naval gulal .. | नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्या
चाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्ये
सरपंच भाजपाचा परंतु, सत्ता
राष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थिती
निर्माण झाली आहे.
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे गटाने संतोष जाधव यांच्या भाजपा पॅनेलला चारी मुंड्या चित केले. सोनगाव अन् जकातवाडी उदयनराजे गटाकडे तर आसनगाव अन् .... सह बरीच गावे शिवेंद्रसिंहराजे गटाकडे गेली आहेत.
कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी, काँगे्रसने आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या गटाला पराभवाचा जोरदार धक्का बसला. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवूनही
सरपंचपद गमावले. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपाकडे गेली असून, भुर्इंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे, तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.
जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहिले.
भाजपाचा ५५ गावांत सत्ता आल्याचा दावा
सातारा जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये भाजपची सत्ता आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेली अनेक दशके राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाºया राजकीय बालेकिल्ल्याला भाजपाने हादरा दिला असून, मोदी अन् फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासाचाच हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी व्यक्त केली.
वाईत धक्कादायक निकाल
वाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी या ग्रामपंचायतीं-मध्ये वीस ते पंचवीस वर्षांची एकाधिकारशाही मोडीत निघत धक्कादायक निकाल हाती लागले.
कोरेगावात भाजपाने उघडले खाते
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने अखेर कोरेगाव तालुक्यात खाते उघडले असून, सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. जळगावमध्ये मात्र ‘गड आला पण सिंह गेला,’ अशी अवस्था भाजपाची झाली. राष्टÑवादी काँग्रेसने काँग्रेसच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या असून, एकंबे व कुमठे ग्रामपंचायतीदेखील आता राष्टÑवादीकडे गेल्या आहेत.
गिरवीत ‘काँग्रेस’ला धक्का
फलटणमध्ये गिरवी ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यातून गेली. राजेगट व मित्रपक्ष मिळून १८, तर कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. शिरवळ खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाºयांना नीरा नदीचा घाट दाखविला.

Web Title: Naval gulal ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.