कोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर : ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:21 PM2018-08-27T12:21:15+5:302018-08-27T12:23:09+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१०० असे ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Koyna @ 104 TMC, doors at five and a half feet: 51 thousand cusec water released | कोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर : ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

कोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर : ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

ठळक मुद्देकोयना @१०४ टीएमसी, दरवाजे साडेपाच फुटांवर ५१ हजार क्युसेक पाणी सोडणे सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१०० असे ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत असलातरी गतवर्षीपेक्षा यंदा धरणे लवकर भरली आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अनेक धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. कोयनेतून तर सतत पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात सोमवारी सकाळी १०४.१८ टीएमसी साठा झाला होता. तर २४ तासांत १०० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात ३६१९९ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत वरती उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून आणि पायथा वीजगृहातून ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील धोम धरणात १२.८० टीएमसी साठा असून, ३७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणातही ९.८३ टीएमसी साठा असून, २२०२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरातून १६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर, बलकवडी या धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.


धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

धोम १३ /६०७
कोयना १०० /५०८५
बलकवडी ३७ /२५८०
कण्हेर १०/७०३
उरमोडी ४०/ ११९९
तारळी ४१/ २१३२

Web Title: Koyna @ 104 TMC, doors at five and a half feet: 51 thousand cusec water released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.