कास पठार फुलांनी बहरु लागले..!

By admin | Published: July 12, 2015 09:10 PM2015-07-12T21:10:26+5:302015-07-12T21:10:26+5:30

पर्यटकांची गर्दी : निसर्गरम्य दृश्य ; मार्गावरील दर्शनी फलक गायब

Kasa Plateau came fluttering flowers ..! | कास पठार फुलांनी बहरु लागले..!

कास पठार फुलांनी बहरु लागले..!

Next

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणारे व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरूवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर अशा फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होवू लागली आहे. परंतू साताऱ्याहून कास पठारावर प्रवेश करताना ‘कास पठार आपले सहर्ष स्वागत करीत आहे.’ हा दर्शनी फलक गेल्या महिन्यातील जोरदार वाऱ्याने पडल्यानंतर गायब झाला आहे. त्यामुळे पठाराच्या मध्यावर आल्यावरच आपण कास पठारावर आलो आहोत, अशी जाणीव होत आहे.सातारा जिल्ह्यातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. पठारावरील मनाला मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची सतत गर्दी असते.
या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशी निळ्या-जांभळ्या लाल पांढऱ्या रंगांची फुले येतात. या पठारावरील सुंदर अशा विविध रंगांच्या फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. अशावेळी कास पठाराचे रुप सतत बदलत असते.
सध्या पांढऱ्या रंगाची आर्किड फुले येण्यास सुरूवात झाली असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटूंबासमवेत दाट धुक्यासह पावसाळी ऋतुचा आनंद घेत या मनमोहक सुंदर अशा फुलांना आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत.
शनिवार, रविवारी पर्यटक महाविद्यालयीन तरुणार्इंची मोठ्या प्रमाणावर कास पठारावर गर्दी होवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)

विविधरंगी फुले...
सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गात कास पठार येथे जून ते आॅक्टोबर महिन्यात विविध रंगांची फुले फुलण्यास सुरूवात होते. यामध्ये झाडांवरील आर्किड, गजरा, अमरी, गुलाबदानी, जमिनीवरील आर्किड, भूईचक्र, आर्किड तसेच इतर लहान वनस्पती, झाडे येतात. सध्या पांढऱ्या फुलांनी पठार बहरण्यास सुरूवात झाली आहे.

कास पठाराच्या प्रवेशद्वारावर असणारा दर्शनी फलक लवकर लावण्यात यावा. तरच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना आपण कास पठारावर आलो आहोत, याची जाणीव होईल.
-गणेश मोहिते, पर्यटक

Web Title: Kasa Plateau came fluttering flowers ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.