सांगलीतून पाण्याची मागणी वाढली; कोयनेतून विसर्ग वाढवला

By नितीन काळेल | Published: February 21, 2024 12:49 PM2024-02-21T12:49:47+5:302024-02-21T12:50:07+5:30

राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला

Increased demand for water from Sangli; Divorce increased from Koyna dam | सांगलीतून पाण्याची मागणी वाढली; कोयनेतून विसर्ग वाढवला

सांगलीतून पाण्याची मागणी वाढली; कोयनेतून विसर्ग वाढवला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालिन द्वारमधून बुधवारी सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून ३१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.

राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागणार आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातही पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सुरु झालेले टॅंकर अजून बंद झाले नाहीत. त्यातच सध्यातर सहा तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर एक लाखाहून अधिक नागरिक आणि हजारो पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे पाणी प्रकल्प आहेत.

गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने ही धरणे भरली नाहीत. त्यातच या धरणावर अनेक सिंचन आणि पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे टंचाई आणि सिंचनाची मागणीमुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. आताही कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी विसर्ग सुरूच आहे.

गेल्यावर्षी कोयना धरण परिसरातही कमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेले. भरण्यासाठी १० टीएमसी पाणीसाठा कमी पडलेला. या कोयनेच्या पाण्यावरच वीजनिर्मिती तसेच अनेक सिंचन आणि पाणी योजना अवलंबून आहेत. त्यातच साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी होत होती. त्याप्रमाणे कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात येत आहे. आता हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता ३१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

आपत्कालिन द्वारमधून १ हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग..

सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच मंगळवारी सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने आपत्कालिक द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा मागणी वाढली. परिणामी बुधवारी आणखी आपत्कालिन द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या द्वारमधून जास्तीतजास्त एक हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग करता येतो, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Increased demand for water from Sangli; Divorce increased from Koyna dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.