लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रीय भाषा म्हणून गौरविण्यात आलेल्या हिंदी भाषेचा सर्वाधिक वापर सातारा जिल्ह्यातील कºहाड शहरात होतो. त्यापाठोपाठ फलटण, सातारा आणि कोरेगाव या शहरांमध्ये हिंदी भाषेची चलती आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी मराठी भाषिक हिंदी बोलतात तर हिंदी भाषिक मराठी बोलतात, अशी मजेशीर माहिती पुढे आली आहे.
देशभरात १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शाळा महाविद्यालयांसह केंद्रीय कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सातारकर आणि हिंंदी या विषयाचे सर्वेक्षण करण्यात आले.
नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत साताºयात स्थायिक झालेले अनेक हिंदी भाषिक अस्खलित मराठी बोलतात. हिंदीच्या अंदाजात त्यांचे मराठी उच्चार गमतीशीर वाटतात. स्त्रीलिंग, पुलिंग यांचा पुरेपूर गोंधळ त्यांच्या भाषेत असतो. हीच अवस्था मराठी भाषिकांची हिंदी बोलताना होते. ‘अरे वो तेरेको नही क्या दिया. तुम विसरे लगताय,’ ही आणि अशी अनेक वाक्य हिंदी आणि मराठी यांची सरमिसळ करणारी आहेत. हीच सातारी तºहेची हिंदी.
बाजारपेठेत कपडे, सराफ, यांच्यासह किराणा मालाचा व्यापार करणारेही हिंदी भाषिक आहेत. रोज येणाºया ग्राहकांना त्यांच्या भाषेत संभाषण केल्याने आपुलकी वाटते, असं या लोकांचं म्हणणं आहे, म्हणूनच ते येणाºया ग्राहकांबरोबर मराठीत बोलतात. हातगाडीवर असणाºया व्यावसायिकांबरोबर तर हटकून सर्वजण हिंदीतच बोलतात. ‘ये कितनेकू दिया?’ हे वाक्य तर अगदी ठरलेलं. ग्रामीण भागातील अनेकजण मुंबईत माथाडी कामगार म्हणून कार्यरत असतात. गावाकडे यात्रा, लग्नकार्य, गणपती, दिवाळी या निमित्ताने येणाºया चाकरमान्यांची बंम्बईया हिंदीही धम्माल असते. ‘अरे साले तेरे को बोला वो समजता नई क्या?’ हे वाक्य मुंबईच्या हेलात साताºयात ऐकताना धम्माल मज्जा येते. कºहाड शहरात मुस्लीम समाजाबरोबरच जैन, मारवाडी समाजही मोठा आहे. त्यामुळे येथे हिंदी बोलणाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ फलटण शहरात हिंदी भाषिकांची संख्याही मोठी आहे.