अभिनेता गोविंदाचा ‘कलारत्न’ने गौरव--राजेंद्र यादव मित्रमंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:41 PM2017-09-20T22:41:07+5:302017-09-20T22:42:16+5:30

कºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला.

 Govinda's Kalaratna Gaurav - Rajendra Yadav's Friendship Program | अभिनेता गोविंदाचा ‘कलारत्न’ने गौरव--राजेंद्र यादव मित्रमंडळाचा उपक्रम

अभिनेता गोविंदाचा ‘कलारत्न’ने गौरव--राजेंद्र यादव मित्रमंडळाचा उपक्रम

Next
ठळक मुद्देकºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. कºहाडकरांच्या प्रेमाने गोविंदाही भारावल्याचे पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता व माजी खासदार गोविंदा यांना यानिमित्ताने ‘कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. आणि कºहाडकरांच्या प्रेमाने गोविंदाही भारावल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कºहाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उद्योजक बाबा महाडिक, अभिनेते समृद्धी जाधव, विजय यादव, कºहाड पालिका उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शिक्षण सभापती सुनील काटकर, बाळासाहेब पवार, अ‍ॅड. विकास पवार, विकी महाडिक, विश्वेश कोरे, पैलवान धनाजी पाटील, पांडुरंग करपे, सुरेश पाटील, इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गोविंदा म्हणाले, ‘कºहाडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. राजेंद्र यादव यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. ’
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘राजेंद्र यादव यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे काम केले आहे. ते कौतुकास पात्र आहे. युवकांनी सदैव यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.’

उदयनराजे भोसले यांची राजेंद्र यादव यांच्यावर असणारी अफाट निष्ठा व युवकांची असणारी ताकद यामुळे राजेंद्र यादव यांचे भवितव्य उज्वल असल्याचे मत यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले. तर यादव यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे जनमानसात त्यांची प्रतिमा उमटली असल्याचे प्रतिपादन शेखर चरेगावकर यांनी केले.
वीर जवान चंद्रकांत गलंडे यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने ११ गरीब मुलींचे राजेंद्र यादव मित्र मंडळाच्या वतीने पालकत्व स्वीकारण्यात आले. वागत केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.


शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
शाहीर आत्माराम यादव शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले. खोडशी, ता. कºहाड येथील पदवीधर शिक्षिका सुलभा लाड, कृष्णानगर, ता. सातारा येथील शिक्षिका स्वाती जाधव, कोडलकर वस्ती भाटकी, ता. माण शाळेच्या शिक्षिका सुवर्णा ओतारी, कºहाडच्या पालकर शाळेच्या शिक्षिका वर्षाराणी पवार, कºहाड पालिकेच्या शाळा क्रमांक पाचचे शिक्षक बेग, बेलोशी, ता. जावळी येथील शिक्षक अनिल जाधव यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कºहाड येथे राजेंद्र यादव यांच्या हस्ते अभिनेता गोविंदा यांना ‘कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी जयवंतराव पाटील, शेखर चरेगावकर, सचिन पाटील, पैलवान आनंदराव मोहिते उपस्थित होते.

Web Title:  Govinda's Kalaratna Gaurav - Rajendra Yadav's Friendship Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.