कचरा डेपोत गायी ? ..मग मालकाला होणार दंड ! खबरदारी घेण्याचे महाबळेश्वर नगर पालिकेकडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:25 PM2017-11-21T18:25:04+5:302017-11-21T20:46:26+5:30

Garbage deport cows? ..morrow the owner will be punished! Appeal from Mahabaleshwar municipal corporation to take precautions | कचरा डेपोत गायी ? ..मग मालकाला होणार दंड ! खबरदारी घेण्याचे महाबळेश्वर नगर पालिकेकडून आवाहन

कचरा डेपोत गायी ? ..मग मालकाला होणार दंड ! खबरदारी घेण्याचे महाबळेश्वर नगर पालिकेकडून आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे जनावरांच्या जीवितास भीतीरोज आणला जाणाराकचरा वेगवेगळा करताना येथील कर्मचारी वर्गाला कसरत करावी लागत

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील तापोळा रस्त्यावर घनदाट जंगलात पालिकेचा घनकचरा खत प्रकल्पाला संरक्षण जाळी आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळी तुटल्यामुळे या प्रकल्पात गुरे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे असणाºया कचºयाचा विचार करता संबंधित जनावर मालकांनी या ठिकाणी गुरे चारण्यासाठी आणण्यास प्रतिबंध घालण्यात यावा अन्यथा पालिका कारवाई करेल, अशा प्रकारची नोटीसदेखील मुख्याधिकाºयांनी बजावली आहे.

महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाबळेश्वरात ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात आहे. शहरातील विविध हॉटेल्समधून ओला-सुका कचरा गोळा केला जातो. रोज हजारो टन ओला-सुका कचरा महाबळेश्वर कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. याच ठिकाणी नगरपालिकेने सुमारे ५० वर्षांपूर्वीचा जुना कचरा या प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स व कचरा वेगवेगळाकरण्याचे काम जोरदार सुरू आहे. परंतु यामध्ये रोज आणला जाणाराकचरा वेगवेगळा करताना येथील कर्मचारी वर्गाला कसरत करावी लागत आहे.
याच परिसरातील कारवी आळा गावामध्ये दूध व्यावसायिक आहेत. मात्र सकाळी संबंधित व्यावसायिक आपली गुरे जवळच असलेल्या या कचरा डेपोमध्ये चरण्यासाठीसोडतात. या ठिकाणी जवळपास१०० हून अधिक गुरे असून, येथे येणाºया कचºयावर ही जनावरे ताव मारताना पाहावयास मिळतात. या कचºयात प्लास्टिकचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या खाण्यात प्लास्टिकसारख्या धोकादायक गोष्टी जात असून, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वीच नगरपालिकेने कारवीआळा परिसरातील नागरिकांना नोटीस देण्यात आली की, ज्या नागरिकांच्या गायी, वासरे आहेत, त्यांनी या परिसरांत पाठवू नये. काही नागरिक सकाळी गाई, वासरे कचरा खाण्यासाठी पाठवतात वसांयकाळ होताच कचराडेपो परिसरातून पुन्हा घेऊन जातात, अशी माहिती कचरा कचरा डेपोमध्ये काम करीत असणाºया कर्मचाºयांनीदिली. दरम्यान, या कचरा डेपोवर महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता-दगडे पाटील
व उपाध्यक्ष अफजल सुतार, कुमार शिंदे, रवींद्र कुंभारदरे, युसूफ शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

पुन्हा एकदा नगरपालिकेकडून ज्याच्या गाई, वासरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीस द्या. समजावून सांगा अन्यथा कचरा डेपोत येणाºया सर्व गायींना गो शाळेत सोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
- अमिता दगडे-पाटील, मुख्याधिकारी

Web Title: Garbage deport cows? ..morrow the owner will be punished! Appeal from Mahabaleshwar municipal corporation to take precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.