Ganesh Chaturthi 2018 : साताऱ्यात  ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे स्वागत, ठिकठिकाणी मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:43 PM2018-09-13T16:43:12+5:302018-09-13T16:45:25+5:30

ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघणार असून, त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Ganesh Chaturthi 2018: Welcome to Ganaraya in Dharam-Tarash Patrol in Satara. | Ganesh Chaturthi 2018 : साताऱ्यात  ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे स्वागत, ठिकठिकाणी मिरवणुका

Ganesh Chaturthi 2018 : साताऱ्यात  ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे स्वागत, ठिकठिकाणी मिरवणुका

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात  ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे स्वागत, ठिकठिकाणी मिरवणुकाबाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली

सातारा : ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघणार असून, त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांच्या स्वागताचे शाहूनगरीला अनेक दिवसांपासून वेध लागले होते. आकर्षक मूर्ती बनविण्यात कारागीर मग्न होते. बाजारपेठही चांगलीच फुलली होती. गुरुवारी सकाळीपासूनच बाजारपेठेत गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून शेतकरी दुर्वा, फुले, आघाडा विक्रीसाठी घेऊन आले होते. घरगुती बाप्पांना घरी नेण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये गर्दी झाली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मोठी मूर्ती मात्र मिरवणुकीद्वारेच केली जात होती. प्रत्येक मंडळ त्यांच्या सोयीनुसार मूर्ती घेऊन जात होते. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढली जात होती.

पोलीस बंदोबस्तात वाढ

पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने अनेक मंडळांना मरिआई कॉम्प्लेक्स परिसरातून मूर्ती नेताना अडचणी येत होत्या. पोलीस सर्व मंडळांना वाट मोकळी करून मिरवणूक घेऊन जाण्यासाठी मदत करत होते.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: Welcome to Ganaraya in Dharam-Tarash Patrol in Satara.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.