माजी सरपंचाला पोलीस पाटलाकडून घरात घुसून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 02:39 PM2021-04-26T14:39:11+5:302021-04-26T14:41:33+5:30

CrimeNews Satara : ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका, असे बोलल्याचा राग मनात धरून खराडवाडी ता.पाटण येथील पोलीस पाटलानेच हातात कायदा घेत घरात घुसून चक्क माजी सरपंचासह घरातील व्यक्तींना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण निवृत्ती खराडे असे गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.

Former Sarpanch beaten up by police | माजी सरपंचाला पोलीस पाटलाकडून घरात घुसून मारहाण

माजी सरपंचाला पोलीस पाटलाकडून घरात घुसून मारहाण

Next
ठळक मुद्देमाजी सरपंचाला पोलीस पाटलाकडून घरात घुसून मारहाण खराडवाडीत खळबळ : जीवे मारण्याची धमकी; परस्परविरोधी तक्रारी दाखल

चाफळ : ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका, असे बोलल्याचा राग मनात धरून खराडवाडी ता.पाटण येथील पोलीस पाटलानेच हातात कायदा घेत घरात घुसून चक्क माजी सरपंचासह घरातील व्यक्तींना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण निवृत्ती खराडे असे गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.

याबाबत माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार, त्याचा भाऊ योगेश कुंभार, शहाजी तानाजी साळुंखे (सर्व रा. खराडवाडी), पंकज संभाजी मोरे (रा.सूर्याचीवाडी) व अन्य दोन जणांनी शुक्रवार दि. २३ रोजी रात्री साडेआठचे सुमारास संगनमताने माझ्या घरात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच पत्नी जयश्री व मुलगा अक्षय यालाही मारहाण केली.

अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे खराडे कुटुंबीय पूर्णपणे हादरून गेले आहेत. या प्रकरणी उंब्रज पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, अधिक तपास अमृत आळंदे करीत आहेत. दरम्यान, माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दमदाटी केल्याबद्दल उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना, तोरस्करवाडीजवळ अडवून मारहाण केली, अशी तक्रार खराडवाडीचे पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

Web Title: Former Sarpanch beaten up by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.