डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:52 PM2019-03-14T12:52:09+5:302019-03-14T12:52:56+5:30

सायगाव : जावळीत समाजकंटकांकडून डोंगरांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत ...

A fire in the house spread to the forest of Kusumbi in the hills of Kusumbi | डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग

डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग

Next
ठळक मुद्देडोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आगशेकडो हेक्टर क्षेत्र खाक : पठारावरील आगीकडेच वनविभागाचे दुर्लक्ष

सायगाव : जावळीत समाजकंटकांकडून डोंगरांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कुसुंबी गावच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. या आगीत शेकडो हेक्टर क्षेत्र जळण्याबरोबरच वन विभागाच्या दुर्लक्षाने हा वणवा गावापर्यंत येऊन येथील शिवराम चिकणे यांच्या घराला आग लागून घराचे नुकसान झाले.

यामध्ये घराच्या पाठीमागील भिंत व छपराने पेट घेतला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान, गाव कामगार तलाठी धर्मा अंबवणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वीस ते पंचवीस हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: A fire in the house spread to the forest of Kusumbi in the hills of Kusumbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.