पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : श्वेता सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 02:07 AM2019-06-18T02:07:24+5:302019-06-18T02:08:36+5:30

‘गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, जी गणेशोत्सव मंडळे नियमांचे उल्लंघन करतील,

Filing of cases against those who violate Environment rules: Shweta Singhal | पर्यावरणाचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : श्वेता सिंघल

सातारा येथील अलंकार हॉलमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवात मद्यविक्री केल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करणार

सातारा : ‘गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, जी गणेशोत्सव मंडळे नियमांचे उल्लंघन करतील, अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली अलंकार हॉल येथे झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

या शांतता कमिटीच्या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात काही दिवशी मद्यविक्री बंदी केली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, ‘या मद्यविक्री बंदीच्यावेळी ज्या दुकानातून मद्यविक्री होईल, त्या दुकानाचे परवाने स्थगित करू. गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अडचणी निर्माण होत असतील तर अतिक्रमणे काढावीत. गणेश मंडळांनी विसर्जनाच्या दिवशी शाडूच्या मूर्ती विसर्जित कराव्यात. तसेच नागरिकांनीही घरात शाडूच्या मूर्तींची स्थापना करून या मूर्ती आपल्या बागेतच विसर्जित कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.’

दडपशाही करून वर्गणी गोळा केल्याचे दिसल्यास खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. या बैठकीत अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, धनंजय जांभळे, चिन्मय कुलकर्णी आदींनी विविध सूचना मांडल्या.

मूर्तिकारांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा
आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तिकार मूर्ती बनवायला सुरुवात करणार आहेत, त्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवाव्यात. प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करू नये, शाडूपासून मूर्ती तयार कराव्यात. पर्यावरणाचा ºहास करणाºया मूर्ती बनविल्या गेल्यास मूर्तिकारांवरही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिला.

 

Web Title: Filing of cases against those who violate Environment rules: Shweta Singhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.