ंमिनिट उशीर झाला तरी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:24 AM2017-12-04T00:24:03+5:302017-12-04T00:24:03+5:30

Even if the minute is delayed, the test will be lost | ंमिनिट उशीर झाला तरी परीक्षेला मुकणार

ंमिनिट उशीर झाला तरी परीक्षेला मुकणार

googlenewsNext


गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत परीक्षा दालनातच बसून राहावे लागणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने
झटपट परीक्षा देऊन पळ काढणाºया आणि परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला. या निर्णयाचा काहीसा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दहावी, बारावी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी राज्यात गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी आगामी परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेसाठी उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याच्या निर्णयासोबतच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेचा विचार करता मंडळाने परीक्षेला उपस्थित राहण्याच्या नियमात बदल करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी वर्गातून बाहेर जाता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येते, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो; पण आता परीक्षेची वेळ सुरू झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धातासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाºया विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करून ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी आहे. त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार होणार नाही, याची जबाबदारी पर्यवेक्षकांची राहील, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .
दरम्यान, शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळेत गैरप्रकार करतात. या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असाही सूर उमटायला लागला आहे.
गैरप्रकारांना नक्की आळा बसेल
गतवर्षी झालेल्या काही गैरप्रकारामुळे माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे नक्कीच गैरप्रकारांना आळा बसेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांचे उशिरा येण्याचे कारण खरच योग्य असेल तर त्यांनाही प्रवेश दिला जाईल. तरीही विद्यार्थी पालकांनी वेळेत कसे पोहोचू याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपप्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी केले.

Web Title: Even if the minute is delayed, the test will be lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.