वैज्ञानिकदृष्टीसाठी प्रोत्साहन देणार

By admin | Published: December 18, 2014 09:20 PM2014-12-18T21:20:10+5:302014-12-19T00:24:33+5:30

फलटण : विज्ञान प्रदर्शनात यशस्वितांचा गौरव

Encourage the scientist | वैज्ञानिकदृष्टीसाठी प्रोत्साहन देणार

वैज्ञानिकदृष्टीसाठी प्रोत्साहन देणार

Next

फलटण : ‘विज्ञान प्रदर्शनात जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी अधिक वैज्ञानिक उपकरणे सादर करावीत, यासाठी विज्ञान प्रदर्शनातील बक्षीस पात्र उपकरणे व ती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे,’ अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी केली आहे.
विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते आठवी या प्राथमिक गटातून ‘सांडपाणी व्यवस्थापन’ हे उपकरण सादर केलेल्या शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी ऋषीकेश सोनवलकर याला प्रथम, ‘फवारणी यंत्र’ हे उपकरण सादर केलेल्या मुधोजी हायस्कूलचा विद्यार्थी यश आदलिंगे याला द्वितीय आणि ‘सोलर वॉटर हिटर’ हे उपकरण सादर केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खटकेवस्तीचा विद्यार्थी सौरभ गावडे याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. इयत्ता ९ वी ते १२ वी या माध्यमिक गटातून ‘बायोगॅस शुद्ध इंधन’ उपकरण सादर केलेल्या मालोजीराजे शेती विद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा दीपक कान्हेरे हिला प्रथम, ‘हायड्रोलिक प्रेशर क्रेन’ हे उपकरण सादर करणाऱ्या शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी एस. डी. जगताप याला द्वितीय आणि ‘आकाशातील शाळा’ हे उपकरण सादर करणाऱ्या कमला निंबकर शाळेचा ओंकार मगर याला तृतीय.
शिक्षकांनी साहित्यनिर्मितीमधील प्राथमिक शिक्षक गटातील बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडीचे वसंत जाधव आणि गोखळीचे शिक्षक एच. टी. निंबाळकर, प्रा. गटातील बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडीचे शिक्षक डी. वाय. शिंदे, माध्यमिक गटातील बक्षीस शिवाजी हायस्कूल वाखरीचे शिक्षक संतोष बाचल यांना तर प्रयोगशाळा परिचर साखरवाडीचे जयवंत काळुखे यांना प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Encourage the scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.