अत्यल्प पाणीसाठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण, सातारा  जिल्ह्यात पाणी-बाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:58 AM2019-04-27T11:58:13+5:302019-04-27T12:01:33+5:30

सातारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली असल्याने दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागून राहिली आहे.

Eclipse of evaporation of water for very low water, water and arrow in Satara district | अत्यल्प पाणीसाठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण, सातारा  जिल्ह्यात पाणी-बाणी 

येरळवाडी तलाव (शेखर जाधव)

Next
ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण, सातारा  जिल्ह्यात पाणी-बाणी दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा; धरणांतील पाणीसाठा घटला

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली असल्याने दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागून राहिली आहे.

जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एकाड-एक दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी भागाबरोबरच पश्चिमेकडील पाऊसमान चांगले असलेल्या पसिरातत राहणाऱ्या लोकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजडावा लागणार आहे.

नांगरट जमिनींना तहान पाण्याची

रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. पाऊस पडेल, या भरवशावर शेतकऱ्यांनी शेती नांगरून ठेवल्या आहेत. नांगरट केलेल्या जमिनींना पाण्याची तहान लागली आहे.

च्रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा होतो. पाऊस पडेल, या भरवशावर शेतकºयांनी शेती नांगरून ठेवल्या आहेत.

धरणांची सद्य:स्थिती

धरण         क्षमता        उपलब्ध पाणी (टीएमसी)             उपयुक्त

कोयना         १०५                    ४४.७२                                   ३९.६०
कण्हेर          ९.५९                    ३.६०                                      ३.१०
धोम              ११.६९                 ३.२३                                     १.४२
उरमोडी          ९.६५                   २.४८                                    २.१७
बलकवडी        ३.९६                   ०.७१                                   ०.५९
तारळी            ५.८४                    २.४३                                   २.४२
येरळवाडी      ०.६९                     निरंक

 

Web Title: Eclipse of evaporation of water for very low water, water and arrow in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.