देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:05 PM2018-11-12T23:05:30+5:302018-11-12T23:07:29+5:30

प्रमोद सुकरे । कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे ...

 Desirians 'Sadu'; Steps 'Guests'! Udayadad's head? Discussion in Rajyaviva Circle | देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

Next
ठळक मुद्देही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही.हर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते

प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. आता तर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मल्हारपेठ, ता. पाटण येथे आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाला उदयसिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या काँगे्रस अंतर्गत संघर्षामुळे पक्षापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या उदयसिंह यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

अ‍ॅड. उदय पाटील यांना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीला काँगे्रसने विलासकाकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यावेळपासून काँगे्रस पक्ष आणि उंडाळकर यांच्यात पडलेले अंतर अजूनही कमी झालेले दिसत नाही. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही उंडाळकर गटाने रयत आघाडीच्या माध्यमातून लढविल्या.

विलासराव पाटील-उंडाळकरांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पूर्ण करीत एक इतिहास रचला; पण त्यांचे वारसदार असणाऱ्या उदयसिंह पाटलांच्या भावी वाटचालीत अनेक अडचणी दिसतात. त्यातील पहिली अडचण म्हणजे काँगे्रस पक्षापासून असणारे अंतर मानावे लागेल. पृथ्वीबाबांनी तर मी कºहाड दक्षिणमधूनच लढणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील अगोदरच राष्ट्रवादीत जाऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत उंडाळकर पिता-पुत्र काही नव्या खेळी खेळतील का? काही नवी चाचपणी करतील का? याकडे साºयांचे लक्ष आहे. त्यामुळेच ते संघाच्या कार्यक्रमाला गेल्यावर जशा उलट-सुलट चर्चा झाल्या. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी लावलेली हजेरी चर्चेची ठरली आहे.

बाळासाहेबांच्या मांडीला मांडी
काँगे्रसला कºहाड पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या उदयसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मांडीला मांडी लावली. आता तर विधानसभेच्या तोंडावर सभापतिपदही आपल्या गटाच्या पारड्यात त्यांनी पाडून घेतलंय. चार दिवसांपूर्वी कºहाडात एका वाढदिवाच्या कार्यक्रमात बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील एकत्रित होते.

पृथ्वीबाबांच्या बरोबरही हजेरी
काही महिन्यांपूर्वी एका इफ्तार पार्टीलाही पृथ्वीबाबा, आनंदराव नाना अन् उदयसिंह पाटील एकत्रित दिसले होते. त्याबरोबर तालुक्यातील एका विकाससेवा सोसायटीने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही पृथ्वीबाबा अन् उदयसिंह पाटलांनी एकत्रित केले होते. त्यावेळपासून सुरू झालेली चव्हाण आणि उंडाळकर गट एकत्रित येणार, ही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही.

..अन् टाळ्यांचा कडकडाट झाला
हर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनाला उदयसिंह पाटील यांना खास निमंत्रण दिले होते. मग उदयसिंह पाटीलही कोयनेचे पेढे घेऊन कार्यक्रमाला हजर झाले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर स्वागत करताना कदमांनी पाटलांच्या खांद्यावर भगवी शाल पांघरली अन् उपस्थितांच्यातून टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title:  Desirians 'Sadu'; Steps 'Guests'! Udayadad's head? Discussion in Rajyaviva Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.