जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:53 PM2017-10-18T23:53:55+5:302017-10-18T23:53:58+5:30

Debt Waiver of Rs. 490 Crore in District | जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचे
चावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत
दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन
भवनात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकºयांना करण्यात आले. यानंतर
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास
शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी
भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
राजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.
या कर्जमाफीमुळे शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले हाते. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकºयालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी विविध योजना राबवत आहे.
या योजनांमधून शेतºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करतो.
आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे.
या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य शेतकºयांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्यकाळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून, शेततकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांकडून काढता पाय...!
गेल्या चार महिन्यांपासून यवतेश्वर ते कास रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आक्रमक झालेल्या पालकमंत्र्यांना यवतेश्वर-कास परिसरातील एकाही बांधकामावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चक्क ‘मला कास अतिक्रमण प्रश्नावर बोलायचे नाही,’ असे म्हणत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

Web Title: Debt Waiver of Rs. 490 Crore in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.