काँग्रेस, राष्ट्रवादीकडे दोन; आघाडीकडे एक - : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:45 PM2019-06-14T23:45:32+5:302019-06-14T23:47:07+5:30

जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडी घेण्यात आल्या. यामध्ये खंडाळ्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने बाजी मारली. तर वडूजमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील गोडसे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. त्याचप्रमाणे कोरेगावात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा उमेदवार निवडला गेला. तर दहिवडीत काँग्रेस, पाटणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. निवडीनंतर सर्वत्र गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.

 Congress, NCP have two; Leading one -: Head of the city, suburban chief | काँग्रेस, राष्ट्रवादीकडे दोन; आघाडीकडे एक - : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी

खंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी प्रल्हाद खंडागळे, उपनगराध्यक्षापदी शोभा गाढवे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

Next

सातारा : जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडी घेण्यात आल्या. यामध्ये खंडाळ्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने बाजी मारली. तर वडूजमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील गोडसे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. त्याचप्रमाणे कोरेगावात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा उमेदवार निवडला गेला. तर दहिवडीत काँग्रेस, पाटणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. निवडीनंतर सर्वत्र गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.


खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने नऊ विरुद्ध आठ असे मताधिक्य घेत सत्ता खेचून आणली. खंडाळ्याच्या नूतन नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रल्हादराव खंडागळे तर उपनगराध्यक्षपदी शोभा गाढवे यांची निवड झाली. सत्तांतरानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून प्रल्हादराव खंडागळे आणि राष्ट्रवादीकडून दयानंद खंडागळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. खंडाळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक, काँग्रेसचे सात नगरसेवक तर एक अपक्ष नगरसेवक असे पक्षीय बलाबल असताना राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले.

नगराध्यक्षा लताताई नरुटे यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण उभारले होते. शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करीत तोच मार्ग ऐनवेळी नगरसेविका शोभा गाढवे यांनी चोखाळल्याने राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यातच राजकीय प्रबळ दावेदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव दोन्ही पक्षांकडून सुरू होती. काँग्रेसच्या सात नगरसेवकांची वज्रमूठ सभागृह नेते अनिरुद्ध गाढवे यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने राहिली. शिवाय राष्ट्रवादीचे दोन शिलेदार हाती लागल्याने सत्तांतर घडविणे सोपे झाले. राष्ट्रवादीकडून आलेल्या शोभा गाढवे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी देत काँग्रेसने बेरजेचे राजकारण केले. या विजयात लताताई नरुटे यांची भूमिका निर्णायक ठरली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संगीता चौगुले व तहसीलदार दशरथ काळे यांनी काम पाहिले. निवडणुकीसाठी समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव

वडूज नगरपंचायत : सुनील गोडसे नगराध्यक्ष तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या किशोरी पाटील
वडूज : वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदीसाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असणारे अपक्ष नगरसेवक शहाजीराजे प्रल्हाद गोडसे यांचा राष्ट्रवादीचे सुनील हिंदुराव गोडसे यांनी १०- ७ मतांनी पराभव केला. तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या किशोरी अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे पाच, भाजपचे तीन व अपक्ष चार असे पक्षीय बलाबल असणाºया वडूज नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सुनील हिंदुराव गोडसे तर काँग्रेसकडून अपक्ष नगरसेवक शहाजीराजे प्रल्हाद गोडसे यांनी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्षपदी शुक्रवारी दुपारी बारा वाजता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील गोडसे यांना शोभा माळी, सुवर्णा चव्हाण, सुनीता कुंभार, काजल वाघमारे, भाजपच्या किशोरी पाटील, अनिल माळी, वचन शहा आणि अपक्ष संदीप गोडसे, विपुल गोडसे या दहा नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले.

काँग्रेसकडून उभे अपक्ष उमेदवार शहाजीराजे गोडसे यांना काँग्रेसचे महेश गुरव, प्रदीप खुडे, मंगल काळे, शुभांगी जाधव, छाया पाटोळे व अपक्ष नगरसेविका डॉ. नीता गोडसे या सात नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. दुसरीकडे उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी केवळ भाजपकडून किशोरी पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. या निवडणुकीत पीठासन अधिकारी रवींद्र पवार व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच राष्ट्रवादी, भाजपसह अपक्ष नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. शहरातून सवाद्य मिरवणूकही काढण्यात केली.

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुनील गोडसे व उपनगराध्यक्ष किशोरी पाटील यांची निवड झाल्यानंतर माजी डॉ. दिलीप येळगावकर, आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासमवेत त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

पाटणच्या नगराध्यक्षपदी चव्हाण बिनविरोध  -  संजय चव्हाण यांची वर्णी : उपनगराध्यक्षपदी सचिन कुंभार
पाटण : पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाचे संजय जयवंत चव्हाण यांची तर उपनगराध्यक्षपदी सचिन किसन कुंभार यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे पाटण नगरपंचायतीवर पुन्हा एकदा पाटणकर गटाचे एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले आहे.

सोमवारी पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी संजय चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या याबाबतची अधिकृत घोषणा बाकी होती. तथापि याबाबत शुक्रवारी आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संजय चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
यावेळी अध्यक्षपदाच्या निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. ही निवडणूकदेखील बिनविरोध होणार, हे निश्चित होते. स्वभाविकच या निवडीतही संबंधित इच्छुकांनी उपनगराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले. त्यानंतर संबंधित सर्व सदस्यांशी विचारविनिमय केला व सर्वानुमते सचिन कुंभार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी सचिन कुंभार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज छाननीतही कुंभार यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यानंतर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी काम पाहिले.

या निवडीनंतर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवर नूतन पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर कार्यकर्ते, हितचिंतकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व घोषणाबाजी करत जल्लोष केला. या निवडीनंतर या नूतन पदाधिकाºयांचा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पंचायत समिती सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

विजयाचा आनंद निश्चित साजरा करा; मात्र कोणाच्याही भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्या. विरोधात लढलेले नगरसेवकही आपल्याच गावाचे आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. निवडणूक संपली की विरोधही संपला पाहिजे. खंडाळ्याच्या विकासासाठी पुन्हा सर्वांच्या सहकायाने एकत्रितपणे काम करायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी इतरांच्या भावनांचा आदर करावा.
- अनिरुद्ध गाढवे
नगरसेवक


 

Web Title:  Congress, NCP have two; Leading one -: Head of the city, suburban chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.