कोरेगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:06 PM2017-08-23T12:06:01+5:302017-08-23T12:07:59+5:30

पूर्व वैमन्यासातून शंभू बबन बर्गे याचा धारदार शस्त्राने खून झाल्यानंतर आरोपीच्या अटकेच्या  मागणीसाठी आज बुधवारी सकाळपासून कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Clogged in koregata | कोरेगावात कडकडीत बंद

कोरेगावात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देआरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा.

कोरेगाव  :  पूर्व वैमन्यासातून शंभू बबन बर्गे याचा धारदार शस्त्राने खून झाल्यानंतर आरोपीच्या अटकेच्या  मागणीसाठी आज बुधवारी सकाळपासून कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.    कोरेगाव शहरात काल रात्रीपासूनच तणावपूर्ण वातावरण असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चाही काढला.   पूर्वीचा राग डोक्यात ठेवून धारदार शस्त्राने छातीत वार करुन युवकाचा खून करण्यात आला होता.या घटनेनंतर कोरेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शंभूच्या खूनप्रकरणी कोरेगावचे उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांचेही नाव फिर्यादीमध्ये आहे.

Web Title: Clogged in koregata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.