पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा : कऱ्हाडात पक्ष्यांसाठी पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:15 AM2018-05-23T00:15:06+5:302018-05-23T00:15:06+5:30

कऱ्हाड : उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीय, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल ! जसं घोटभर पाण्यासाठी आपली तगमग होते. तशीच त्यांचीही होते.

 Birdy human moisture: Watercollection for birds in Karhad | पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा : कऱ्हाडात पक्ष्यांसाठी पाणपोई

पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा : कऱ्हाडात पक्ष्यांसाठी पाणपोई

googlenewsNext
ठळक मुद्देसिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा चिवचिवाट; शिंदे कुटुंबीयांच्या अंगणात पक्ष्यांचे थवे

संतोष गुरव ।
कऱ्हाड : उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीय, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल ! जसं घोटभर पाण्यासाठी आपली तगमग होते. तशीच त्यांचीही होते. अशा पाण्यावाचून हाल होणाऱ्या पक्षीजीवाला माणुसकीतून ओलावा देण्याचं काम काही कºहाडकर नागरिकांकडून केलं जातंय. येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील नागरिकांनी पक्ष्यांसाठी भोजनगृह बनवलंय तर दररोज सकाळी अनेक पक्ष्यांची दिवसाची सुरुवात शिवाजीनगरमधील सुनीता शिंदेंच्या घरी बे्रकफास्ट केल्याशिवाय होत नाही.

शहरातील शिवाजी हौसिंग सोसायटीत राहणाºया अनेक कुटुंबीय तसेच नागरिकांनी दाराबाहेर, खिडकी किंवा अंगणात येणाºया पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे तयार केलेत. तर सल्लाउद्दीन मुश्रीफ यांनी चक्क ईदगाह मैदान परिसरात पक्ष्यांसाठी गाड्यांच्या बॅटरीचे पाणवठे, सिमेंटचे जलकुंभबनवले आहेत. यांच्याप्रमाणे अनेकांपैकी कुणी झाडाला
उंच मडके टांगले आहेत. तर कुणी प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलमधोमध कापून त्यापासून पक्ष्यांना पाण्याचे छोटे भांडे बनविले आहे.

पक्ष्यांविषयी प्रेम असल्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून आमच्या घरी अनेक पक्षी सकाळी सकाळी नाष्टा करण्यासाठी न चुकता हजेरी लावतात. बुलबुलची जोडी तर पाणवठ्यामध्ये मनसोक्तपणे अंघोळही करते. कावळा, कोकीळ, चिमणी यांच्याबरोबर अनेक पक्षी पाणी पिण्यासाठी येतात, हे शिवाजीनगर येथे राहत असलेल्या सुनीता शिंदे या त्यांच्याकडे येणाºयांना खूप आनंदाने सांगतात.

त्या अंगणामध्ये तसेच घरापाठीमागील जागेत पक्ष्यांसाठी पाण्यासोबत खाऊही ठेवत आहेत. अन्न तसेच पाणी मिळत असल्याने त्यांच्या अंगणात दररोज सकाळी पक्ष्यांची शाळा भरू लागलीय. संक्रातीच्या सणाला वापरल्या जाणाºया सुगड्या, लहान मडके, प्लास्टिकचे कॅन किंवा बॉटल हे मधोमध कापून त्यामध्ये पाणी ठेवल्यास पक्षी व लहानपाळीव प्राणी ते आनंदाने पितात, अशा या नागरिकांकडून पक्ष्यांविषयी चांगलीच काळजी घेतली जात  आहे.

कृत्रिम घरटे बनविण्याची कार्यशाळा
पक्षी तसेच चिमणी वाचवाचा संदेश देत कºहाड येथे २०१४ रोजी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याची कार्यशाळा घेतली होती. यावेळी विविध संस्थांबरोबर एन्व्हायरो क्लबनेही यात सहभाग घेतला होता. त्यावेळी पक्षी अभ्यासक डॉ. उमेश करंबेळकर यांनी मुलांना पक्ष्यांविषयी व घरट्यांविषयी मार्गदर्शन केले होते.

पक्ष्यांसाठी भोजनगृहाची सोय..
येथील शिवाजी उद्यानात वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज विविध जातींचे पक्षी येत असतात. त्यांच्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी भोजनगृहाची व पाण्याची सोय केली आहे. हिरवळ व पाण्याची सोय असल्याने येथे पक्ष्यांचा सारखा किलबिलाट असतो.

प्लास्टिकच्या बाटल्यांचाही चांगला उपयोग
शहरात मोठ्या प्रमाणात आढळणाºया प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर हा पक्ष्यांच्या पाण्यासाठी चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. या बाटल्या आडव्या कापून त्यात पाणी सोडून त्या झाडांना टांगल्यास त्यातून पक्षी सहजरीत्या पाणी पिऊ शकतील.

सह्याद्री व्याघ्रचाही पक्षी वाचविण्यासाठी हातभार
येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात पक्ष्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानेही सहकार्य केले आहे. त्यांच्या माध्यमातून २० मार्च २०१७ रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त झाडावरील पक्ष्यांचे भोजनगृह व पाणपोया देण्यात आलेल्या आहेत. वर्षभरापूर्वी दिलेले भोजनगृह आजही उद्यानात ठिकठाक आहेत.
 

सध्या उन्हाळा ऋतू असल्यामुळे पक्ष्यांना या ऋतूत पाण्याची कमतरता भासत असते. ग्रामीण भागात नद्या, विहिरी असल्यामुळे तेथे पाणी मुबलक प्रमाणात आढळते. याउलट शहरात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते, अशा पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
- सुनीता शिंदे, गृहिणी, शिवाजी नगर, कºहाड

Web Title:  Birdy human moisture: Watercollection for birds in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.