वीर जवान यांच्या स्मरणात भक्तीशक्ती दिंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:25 PM2018-07-03T15:25:59+5:302018-07-03T15:26:02+5:30

दिंडीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

Bhakti Shakti Dindi Soma in remembrance of heroes | वीर जवान यांच्या स्मरणात भक्तीशक्ती दिंडी सोहळा

वीर जवान यांच्या स्मरणात भक्तीशक्ती दिंडी सोहळा

Next

सातारा :  शूरवीर सैनिक देशासाठी लढले ज्यांना वीरमरण आले, अशा सातारा जिल्ह्यातील वीर जवान त्यांच्या स्मरणार्थ जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील अंध वारकरी विजय महाराज पवार हे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी  सोहळ्याचे आयोजन करणार आहेत. ही पालखी शुक्रवार दि.६ रोजी निघणार असून सोमवार दि २३ रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे.

या पालखीत सहाशे वारकरी सहभागी होणार आहेत. जन्मापासून अंध असणारे विजय महाराज पवार हे गेली सत्तावीस वर्षे सलग
दिंडी सोहळा आयोजित करत असतात. या सोहळ्याला समाजातील विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कोणी अन्नधान्य, कोणी अन्नदान ,तर कोणी आर्थिक मदत करत आहे. यंदा वीर जवान यांच्यासाठी सातारा जिल्हातून निघणारी पालखी देशातील पहिली पालखी सोहळा आहे. देशाच्या शूरवीर जवानांसाठी ही अनोखी निघत असणारी पालखी सोहळा हा अनेकांमध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण करतो
तसेच अनेकांना प्रेरणाही या दिंडीतून मिळत आहे.

सातारा येथे विजय महाराज पवार आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेसमोर बसणा-या शिक्षक कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी पाठिंबा जाहीर केला तसेच विठ्ठलाच्या चरणी तुम्हा सर्वांचा गा-हाने मी मांडणार आहे, असे सांगितले. तसेच शिक्षक कर्मचा-यांनीही या दिंडीला पाठिंबा दिला व चांगली मदत करू असे आश्वासन महाराजांना दिली.


वीर जवानांबद्दल कृतज्ञतेसाठी जागृती

ही दिंडी वीर जवान यांच्या स्मरणार्थ आयोजित केली असून त्याला नागरिकांनी  सढळ  हातांनी मदत करावी असे अंध विजय पवार यांनी  आव्हान केले आहे. सध्या जनजागृती व लोकसहभागाची सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भेट देऊन हभप विजय महाराज वीर जवान यांच्याबद्दल माहिती देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Web Title: Bhakti Shakti Dindi Soma in remembrance of heroes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.