खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.
सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सीएम महाराष्टÑ’ या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर झळकू लागली आहे. खटाव तालुक्यातील भोसरेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव तसेच कोरेगाव तालुक्यातील धामणेरच्या शालिनी पवार यांच्या मुलाखती टिष्ट्वट केल्या गेल्या आहेत. भोसरेतील जलयुक्त शिवारमुळे झालेल्या फायद्याची माहिती नितीन जाधव यांनी कॅमेºयासमोर दिली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत टीम’ त्या गावात थडकताच वेगळीच कहाणी पुढे आली.
‘लोकमत’शी बोलताना नितीन जाधव सांगत होते की, ‘काही दिवसांपूर्वी पुण्याचे काही सरकारी अधिकारी घेऊन आमच्या तालुक्याचे बीडीओ आले. गावच्या जलयुक्त शिवारबद्दल बोला म्हटल्यावर मी कौतुकच केलं, मात्र, टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी... होय, हे माझं सरकार’ या वाक्याखाली माझी मुलाखत दिसू लागताच मी दचकलो. कारण शेतकºयांंना दिलेले शब्द आजपर्यंत सरकारने पाळले नाहीत. तसेच या गावात जलयुक्त शिवारची जी काही कामे झाली, त्यात ग्रामस्थांचाच ७० टक्के वाटा आहे.’
‘अमिर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेत सर्व गट-तट विसरून आम्ही सहभागी झालो, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत राज्यात आम्ही द्वितीय आलो. अशावेळी संपूर्ण कामाचे श्रेय सरकार घेत असेल तर आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे, माझे आजोबा भानुदास गुरुजी पूर्वी भाजपचे होते. त्यांनी दिलीप येळगावकर यांचा प्रचारही केला होता. नंतर ते त्या पक्षापासून दूर सरकले. आता तर मी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या गटाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात असून यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मी राष्टÑवादीचेच काम केले आहे. अशावेळी ‘होय... हे माझं सरकार’ असं कसं काय मी म्हणू शकतो,’ असाही आश्चर्याचा सवाल नितीन जाधव यांनी विचारला.
योगायोगाने माझी मुलाखत प्रसारित
पुण्याहून आलेली टीम गावातील एका शेततळी लाभार्थ्याची मुलाखत घेणार होती. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी सहज मला बोलतं केलं, त्यानंतर ते शेततळ्यावर गेले तेव्हा प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे खºया लाभार्थ्याची मुलाखतच घेता आली नाही. माझीच प्रसारित झाली.
- नितीन जाधव