बांडगुळांनी जिल्हा तोडला असता.. उदयनराजेंची रामराजे-शिवेंद्रसिंहराजेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:12 AM2018-06-16T00:12:35+5:302018-06-16T00:12:35+5:30

‘ कुणीही यावे अन् टपली मारून जावे, अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली होती. बारामती आणि कºहाड जिल्हे करून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता.

 Bandgul was broken by the district. Udayanraajne's Ramraje-Shivendra Singh janavaraka vaccine | बांडगुळांनी जिल्हा तोडला असता.. उदयनराजेंची रामराजे-शिवेंद्रसिंहराजेंवर टीका

बांडगुळांनी जिल्हा तोडला असता.. उदयनराजेंची रामराजे-शिवेंद्रसिंहराजेंवर टीका

Next
ठळक मुद्देसंकुचित बुद्धीने चिखलफेक करू नका

सातारा : ‘ कुणीही यावे अन् टपली मारून जावे, अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली होती. बारामती आणि कºहाड जिल्हे करून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता. तो आपण हाणून पाडला. जिल्ह्यात सर्व बांडगूळच जन्माला आले आहेत,’ असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मारला. त्यांचा निशाणा थेट रामराजे अन्

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर उदयनराजे म्हणाले, ‘तुमच्यात धमक असेल तर समोरा-समोर भ्रष्टाचाराचे आरोप करा. गांधी मैदानावर जाहीर सभा बोलवा, त्या सभेत तुमच्या व्यासपीठावर मी जाहीरपणे सांगतो, कुणी कसा भ्रष्टाचार केला. २२ महिने मला काकांमुळेच तुरुंगवास भोगावा लागला. तरी मी काही बोललो नाही. बंधुराज म्हणतात की, खासदारकीला उमेदवार निवडताना शरद पवार चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असे माझ्याबाबतीत विधान केले की, स्वत:बाबत? हे शिवेंद्रसिंहराजेंच्या संकुचित बुद्धीला माहीत. त्यांना कधी व्यापकता येणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘४२ वर्षे तुमच्याच घराण्यात सत्ता होती. तालुक्याचा किती विकास केला, ते मांडा. पालिकेत कचरा आणि स्वच्छतेत ६० लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तुम्ही तुमच्या सर्व संस्था खाऊन टाकल्या मग त्याचे विलिनीकरण केले. नावे ठेवणे सोपे असते, प्रत्येकवेळा रडीचा डाव खेळून नाकर्तेपणा लपवू नका. ज्यांना काही गंध नाही, अशा लोकांना संस्थेवर घेतले. त्यामुळे रयत एक प्रायव्हेट संस्था झाली आहे. जर रयत संस्थेवर शिवेंद्रसिंहराजेंना घेतले असते तर त्यांच्या संस्था विलिनीकरण केल्या तशी रयत संस्थाही विलिनीकरण करावी लागली असती. पालिकेचे बजेट हे १५० कोटींचे असताना ७०० कोटींची कामे इतिहासात कधीच सुरू झाली.’

सो जा बेटे शिवेंद्रराजे.. आ जायेंगे उदयनराजे
शिवेंद्रसिंहराजेंनी दाढी वाढवून वेगळा लूक केला आहे. मैं नायक नही खलनायक हू, हे चांगले आहे. खलनायक म्हणजे हा व्हिलनच असतो. स्पर्धा करावी तर कामातून, असे वेगळे लूक करून करू नये. मला यावर खोलात जाऊन बोलायचे नाही; पण दाढी वाढवून लोकांना दम देण्यापेक्षा जप करत बसा. नाही तर लोक म्हणतील ‘सोजा बेटा शिवेंद्रसिंहराजे, आ जायेंगे उदयनराजे,’ असा मिश्कील टोलाही यावेळी उदनयराजेंनी लगावला.
 

खुडूक कोंबड्यागत वागू नका..
सोना अलाईज कंपनीत स्थानिकांना डावलून बिहारी कामगार भरले होते. यावर आपण बोललो माझ्यावर मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यास स्वयंघोषित नेत्यानेभाग पाडले. अशा नेत्याच्या बुद्धीची किळस करावी वाटते. मला ठोकायचे असते तर मी ठोकून काढले असते. असे सांगून उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानाची खिल्ली उडविली. ‘खासदारकीपेक्षा मी वॉर्डातून नगरसेवक पदाची निवडणूक लढवेन, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. त्यांना खासदारकीला उभे राहायचे असेल तर त्यांचे मी स्वागतच करतो. तसेच त्यांना नगरसेवकपदाची निवडणूक लढवायची असेल तर आमच्या स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेऊन स्वीकृत नगरसेवकही करतो. विकासकामांवर बोला. उगाच फालतुगिरी करू नका. एखाद्या खुडूक कोंबड्यागत वागू नका. तुमच्याकडून कामे करताना कधी सहकार्य मिळालेच नाही. अडथळे मात्र निर्माण केलेत. शिवाजी विद्यापीठाच्या सातारा उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. लवकरच जागेची पाहणी करून इमारतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

Web Title:  Bandgul was broken by the district. Udayanraajne's Ramraje-Shivendra Singh janavaraka vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.