Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार 

By नितीन काळेल | Published: April 18, 2024 01:20 PM2024-04-18T13:20:44+5:302024-04-18T13:25:27+5:30

एकजण ताब्यात; मृत भरतगाववाडीतील 

Ajinkyatara Sugar Factory firing due to dispute in satara, Security guard killed | Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार 

Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार 

सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये वादावादीच्या कारणातून सुरक्षारक्षाकवर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षारक्षक अंकुश रामकृष्ण शिंदे (रा. भरतगाववाडी, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सत्यवान बाळकृष्ण साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार शुभम बाळासाहेब चव्हाण (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीनुसार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

मृत अंकुश शिंदे हे मागील सहा महिन्यांपासून शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामधील रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी वादावादीतून त्यांच्यावर शुभम चव्हाण याने पिस्टलमधून गोळी झाडली. ही गोळी शिंदे यांच्या छातीत लागली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित शुभम चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

छातीवर लागली गोळी..

पिस्टलमधून झाडलेली गोळी मृत अंकुश शिंदे यांच्या छातीत डाव्या बाजुला लागली होती. त्याठिकाणी खोल जखम झालेली. तर या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने हालचाल करुन संशयित शुभम चव्हाण याला ताब्यात घेतले. संशयित हा बगॅस यार्डमध्येच काम करत होता. त्याची कोणत्या कारणातून सुरक्षारक्षक शिंदे यांच्याबरोबर बाचाबाची झाली याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Ajinkyatara Sugar Factory firing due to dispute in satara, Security guard killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.