दूषित पाण्यावर ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:17 PM2017-11-05T23:17:48+5:302017-11-05T23:21:00+5:30

Action plan on contaminated water | दूषित पाण्यावर ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

दूषित पाण्यावर ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Next


कºहाड : कºहाड शहरातून कृष्णा नदीत पडत असलेल्या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करण्यात यावेत व त्याचा पंधरा दिवसांत अ‍ॅक्शन प्लॅन सादर करावा, याबाबतची नोटीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नुकतीच पालिकेस पाठविण्यात आली आहे. तर पुणे येथे पाणी तपासणीसाठी पाठविलेले नमुने दोनच दिवसांत मिळणार आहेत.
कºहाड येथील कृष्णा नदीची व नदीकाठच्या चार ठिकाणी असलेल्या सांडपाणी नाल्यांची गत आठवड्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे साताºयाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शहरातील नाल्यांतून दूषित पाणी नदीत मिसळत असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालिका अधिकाºयांना केल्या होत्या. तसेच दूषित पाणी प्रश्नी लवकरच नोटीस देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिकेस प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून खबरदारीचे नोटीस देण्यात आले आहे. शहरातून नदीत पडणारे सांडपाण्याचे प्रवाह तत्काळ बंद करावे व त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन पंधरा दिवसांत सादर करावा, अशा सूचना प्रदूषण नियंत्रणकडून देण्यात आलेल्या नोटिसीत आहेत.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार सूचना करूनही पालिकेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा कºहाडकरांनी अनुभवला आहे. अशात शनिवारी बुधवार पेठेतील पंचशीला चौकात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कºहाडकरांना यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या बदलेल्या चवीमुळे त्रास सहन करावा लागला. आता तर चक्क नळाच्या पिण्याच्या पाण्यातूनच डेंग्यूच्या अळ्या आल्या. अगोदरच नदी प्रदूषणचे प्रकरण निवळत नाही, तोपर्यंत आता पिण्याच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून पालिकेवर कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याच्या सूचना
कºहाड पालिकेने पंधरा दिवसांच्या आतमध्ये शहरातील गटारावाटे नदीत मिसळणाºया सांडपाण्याचे प्रवास बंद करून त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करणे गरजेचे आहे. या प्लॅननुसार यामध्ये प्रत्येक दिवसाची नोंद करून त्या-त्या दिवशी पालिकेने कोणती कामे केली, याबाबत माहिती द्यावयाची आहे.

Web Title: Action plan on contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.