प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पंधरा व्यापाऱ्यांवर कारवाई, लोणंद नगरपंचायतीने उपसले दंडाचे शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:33 AM2017-11-04T11:33:38+5:302017-11-04T11:41:18+5:30

पर्यावरणाचा हास होऊ नये म्हणून पन्नास मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी आहे. तरीही ग्राहकांना नाराज करायला नको म्हणून लपूनछपून या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खंंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने शनिवारी दंडाचे शस्त्र उपसले. या पथकाने पंधरा व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात हजारांचा दंड वसूल केला.

Action on fifteen merchants using plastic bags, Lonand Nagar Panchayat arson weapon | प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पंधरा व्यापाऱ्यांवर कारवाई, लोणंद नगरपंचायतीने उपसले दंडाचे शस्त्र

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पंधरा व्यापाऱ्यांवर कारवाई, लोणंद नगरपंचायतीने उपसले दंडाचे शस्त्र

Next
ठळक मुद्देसाडेसात हजारांचा दंड लोणंद नगरपंचायतीची कारवाई

लोणंद (सातारा) ,दि. ०४ : पर्यावरणाचा हास होऊ नये म्हणून पन्नास मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी आहे. तरीही ग्राहकांना नाराज करायला नको म्हणून लपूनछपून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खंंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने शनिवारी दंडाचे शस्त्र उपसले. या पथकाने शहरातील पंधरा व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात हजारांचा दंड वसूल केला.

लोणंद नगरपंचायतीने सर्वसाधारण सभेतील ठरावाद्वारे लोणंद शहरात प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदीबाबत ठराव केलेला होता. तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शहरातील किरकोळ व्यापारी व घाऊक व्यापारी यांच्याकडे लोणंद नगरपंचायतीच्या वतीने शहरातून प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत १५ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात हजारांचा दंड वसूल केला. तसेच ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या धडक मोहिमेमध्ये मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, कार्यालयीन अधीक्षक शंकर शेळके,बाळकृष्ण भिसे, रामदास तुपे, पापा पानसरे, गोरख माने, हणमंत माने यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


लोणंद नगरपंचायतीने शहराच्या भल्यासाठी प्लास्टिक पिशव्यांविरोधात मोहीम राबविली आहे. भविष्यातही वेळोवेळी प्लास्टिक संदर्भात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास पाचशे, पाच हजार, दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पन्नास मायक्रोपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या वापरून सहकार्य करावे.
- अभिषेक परदेशी
मुख्याधिकारी, लोणंद

Web Title: Action on fifteen merchants using plastic bags, Lonand Nagar Panchayat arson weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.