बसचालकाच्या सतर्कतेने बचावले ५० जणांचे प्राण, बसचा ब्रेक फेल, सर्व मुंबईचे रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 06:04 PM2017-12-25T18:04:50+5:302017-12-25T18:05:04+5:30

अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील सुमारे ५० जण आले होते. हा किल्ला पाहून उतरत असताना खासगी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने सतर्कतेने गाडी पहिल्या गिअरमध्ये घेत दोन-तीन ठिकाणी धडकवण्याचा प्रयत्न केला.

50 survivors of survivors alerted by bus alert, bus break failure, all residents of Mumbai | बसचालकाच्या सतर्कतेने बचावले ५० जणांचे प्राण, बसचा ब्रेक फेल, सर्व मुंबईचे रहिवासी

बसचालकाच्या सतर्कतेने बचावले ५० जणांचे प्राण, बसचा ब्रेक फेल, सर्व मुंबईचे रहिवासी

googlenewsNext

सातारा : अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील सुमारे ५० जण आले होते. हा किल्ला पाहून उतरत असताना खासगी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने सतर्कतेने गाडी पहिल्या गिअरमध्ये घेत दोन-तीन ठिकाणी धडकवण्याचा प्रयत्न केला. ब-याच प्रयत्नांती गाडी थांबविण्यात यश आले. या अपघातात सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाशी (मुंबई) येथील सुमारे ५० जण सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी आले आहेत. सोमवारी त्यांनी सज्जनगड येथे जाऊन श्री रामदास स्वामी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण साता-यात आले. दुपारच्या सुमारास ते अजिंक्यतारा किल्यावर गेले होते. ते पाहून झाल्यानंतर पुन्हा ते खासगी बसमध्ये बसून साता-यात येत होते. त्यावेळी ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने पहिल्या गिअरमध्ये गाडी घेत दोन-तीन ठिकाणी धडकवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश येत नव्हते. विजेच्या खांबावरही गाडी घातली. त्यानंतर कसेबसे गाडीवर नियंत्रण मिळवत बाजूला गाडी थांबवली. या अपघातात सात ते आठ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे.  
दरम्यान, अजिंक्यतारा किल्यावर अपघात झाल्याची माहिती मिळताच सातारकरांनी तिकडे धाव घेतली. अनेकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

Web Title: 50 survivors of survivors alerted by bus alert, bus break failure, all residents of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात