१८९ किलोमीटरचा परिसर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:12 PM2019-05-12T23:12:57+5:302019-05-12T23:13:09+5:30

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस ...

The 189-km-long compound area is Pachakak | १८९ किलोमीटरचा परिसर चकाचक

१८९ किलोमीटरचा परिसर चकाचक

Next

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस रोडवर एकूण १८९ किलोमीटरच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. तसेच दोन टोलनाके व ४४ उड्डाणपुलांची देखील स्वच्छता करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुण्याहून-कोल्हापूरकडे जाणाऱ्या आशियाई महामार्गावर स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल ३ हजार ६१२ सदस्यांनी कचरा गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी कºहाड नगरपरिषदेच्या सुका कचरा संस्करण केंद्र्रास पाठविण्यात आला.
दरम्यान, या महामार्गाावरून वाहतूक करणाºया सरासरी सात ते आठ हजार गाड्यांतील साधारण लाखो प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास प्रतिष्ठानचे कार्य यशस्वी झाले आहे. यावेळी कित्येक वाहनचालकांनी चालू गाडीतून कचरा अथवा प्लास्टिक बाहेर न टाकण्याचा मानस व्यक्त केला. ही प्रतिष्ठानच्या कार्यास मिळालेली पोचपावतीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
गाव, वाड्या, वस्त्या, सरकारी, निमसरकारी कार्यालये, शहरातील मुख्य रस्ते व उपरस्ते, न्यायालय, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, तलाव नदीकाठचा परिसर, स्मशानभूमी, दफनभूमी आदी ठिकाणी प्रतिष्ठानमार्फत आत्तापर्यंत स्वच्छता अभियाने यशस्वीरीत्या झाली आहेत. मात्र १८९ किलोमीटर आशियाई महामार्गाची दुतर्फा सेवारस्ता स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. यामुळे सर्व स्तरातून प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
दरम्यान, या स्वच्छता अभियानात जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह पलंगे, खेड सरपंच इंदिरा बोराटे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, बासुतली खान, सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग कºहाड अस्मिता पाटील, उंब्रजचे उपसरपंच अजित जाधव, उत्तम कांबळे नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दाताळे, घमेली, खोरे, झाडू, पंजे आदी साहित्य स्वत: आणून स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले.

Web Title: The 189-km-long compound area is Pachakak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.