पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:36 PM2019-03-07T16:36:57+5:302019-03-07T16:40:11+5:30

उन्हाचा कडाका वाढत असताना अनेक जलस्त्रोत आटत आहेत. अशा परिस्थित पक्ष्यांची तडफड सुरु झाल्याने त्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले आहेत. पिपल्स फॉर अ‍ॅनिमल संघटनेने शेकडो पाण्याच्या बॉटल्स व प्लेटस्च्या माध्यमातून झाडांवरच पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

The zombies have been used to thresh the birds | पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले

ठळक मुद्देबाटली आणि प्लेटचा वापर करून व्यवस्थाशेकडो झाडांवर लटकविल्या बॉटल-प्लेटस्

सांगली : उन्हाचा कडाका वाढत असताना अनेक जलस्त्रोत आटत आहेत. अशा परिस्थित पक्ष्यांची तडफड सुरु झाल्याने त्यांची तहान भागविण्यासाठी प्राणीमित्र सरसावले आहेत. पिपल्स फॉर अ‍ॅनिमल संघटनेने शेकडो पाण्याच्या बॉटल्स व प्लेटस्च्या माध्यमातून झाडांवरच पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.



उन्हाच्या कडाक्याने पक्षांना पाणी मिळत नाही त्याने पक्षी मरत आहेत. निसर्ग, पर्यावरण वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी जिवंत राहिले तर माणूस जिवंत राहणार आहे, याची जाणीव ठेऊन अहो- रात्र प्राणी मित्र,पक्षी मित्र, निसर्ग मित्र, विना मोबदला काम करत आहेत.

जागतिक वन्यदिना निमित्त, पक्षीप्रेमी सचिन शिनगारे यांनी पक्ष्यांसाठी पाण्याचे प्लेट्स दिले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पिपल फॉर अ‍ॅनिमल रेस्क्यु आणि ट्रीटमेंट सेंटरमार्फत पार्श्वनाथ नगर, सांगली मिरज रोड येथे पक्ष्यांची तहान भागवण्याकरिता पाण्याचे प्लेट्स लावण्यात आले.

संघटनेचे सांगलीे जिल्हा अध्यक्ष अशोक लकडे, शुभांगी लकडे व सदस्य मंदार शिंपी, अ‍ॅड. बसवराज होसगौदर, ऋषिकेश लकडे, रिद्दी लकडे, आदींनी हा उपक्रम राबविला.

Web Title: The zombies have been used to thresh the birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.