तासगावात पाणीपुरवठा जॅकवेलचा ठेका देणार नगरपालिका सभा : राष्टवादीचा विरोध डावलून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 08:02 PM2018-06-07T20:02:41+5:302018-06-07T20:02:41+5:30

तासगाव शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पाचवा मैल येथील मुख्य जॅकवेलवर कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी पाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा

 Water supply will be given to Jacqueswell's municipal council for the hour-long meeting: | तासगावात पाणीपुरवठा जॅकवेलचा ठेका देणार नगरपालिका सभा : राष्टवादीचा विरोध डावलून मंजुरी

तासगावात पाणीपुरवठा जॅकवेलचा ठेका देणार नगरपालिका सभा : राष्टवादीचा विरोध डावलून मंजुरी

Next

तासगाव : तासगाव शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पाचवा मैल येथील मुख्य जॅकवेलवर कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी पाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राष्टवादीने या ठरावाला विरोध केला. त्यानंतर ठराव मताला टाकून बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून मंजूर झालेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित वायकोस, उपनगराध्यक्ष दीपाली पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी विषयपत्रिकेवरील वीसही विषय एकमताने मंजूर करण्याची मागणी केली. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी त्याला सहमती दर्शवली. मात्र राष्टवादीच्या नगरसेवकांनी जॅकवेलवरील काम ठेका पध्दतीने देण्याच्या विषयाला आक्षेप घेतला. अन्य शहरांच्या तुलनेत तासगावला पाणी पुरवठा चांगल्या पध्दतीने होतो.

जॅकवेलच्या ठिकाणीही नगरपालिकेचे कर्मचारी चांगल्या पध्दतीने काम करतात. त्यामुळे हे काम ठेका पध्दतीने देऊ नये, अशी मागणी राष्टवादीच्या नगरसेवकांनी केली. राष्टवादीच्या विरोधामुळे नगराध्यक्ष सावंत यांनी हा विषय मताला टाकण्याचा निर्णय घेतला. १४ विरूध्द ८ मतांनी ठेका देण्याचा विषय मंजूर झाला.स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पालिकेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून स्वच्छतेसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्याचा निर्णय झाला.यावेळी प्रभाग नऊमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून वॉटर एटीएम बसविण्याचा निर्णय झाला.

सभेत झालेले महत्त्वाचे निर्णय...
- नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी ३८ लाखांची तरतूद
- वृक्षलागवड अभियानांतर्गत शहरातील दहा हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन
- छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळे खरेदीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याने, उर्वरित गाळ्यांसाठी कमी अनामत रक्कम घेणे
- भिलवडी नाका परिसरातील खोकी जाहीर लिलाव पध्दतीने भाड्याने देणे

कर्मचाºयांना मिळणार वैद्यकीय बिल
तासगाव नगरपालिकेत अद्यापपर्यंत कर्मचाºयांना वैद्यकीय उपचारासाठी कोणताही खर्च मिळत नव्हता. मात्र गुरुवारी झालेल्या सभेत यापुढे कर्मचाºयांना वैद्यकीय उपचाराचा खर्च शासन निकषांनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली असून कर्मचारी संघटनेच्यावतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

Web Title:  Water supply will be given to Jacqueswell's municipal council for the hour-long meeting:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.