आटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:24 PM2018-05-09T18:24:18+5:302018-05-09T18:24:18+5:30

कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

On the teacher's website at Atpadi, Netsinjon will fly abroad and abroad | आटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या

आटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या

Next
ठळक मुद्देआटपाडीतील शिक्षकाच्या संकेतस्थळावर देश-विदेशातील ​​​​​​​नेटीझन्सच्या उड्या१० महिन्यात आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी संकेतस्थळाला भेट

अविनाश बाड

 आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींबद्दल आदराची भावना फारशी दिसत नसताना, कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने कमाल केली आहे. त्यांनी माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत शिक्षक झालेले परशुराम शिंदे मूळचे सोलंकरमळा, मुक्काम हिवरे, पोस्ट धावडवाडी, ता. जत येथील. २०१४ पासून ते कौठुळीत नोकरीस आहेत.

माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्यक्ष शिक्षक, पालक मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण मोबाईलचा केवळ संभाषणापुरताच उपयोग न करता, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठीही मोबाईलचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी शैक्षणिक संकेत स्थळाची निर्मिती केली.

www.pdshinde.in असा मजकूर इंटरनेट ब्राऊजरवर सर्च करताच माझी शाळा हे संकेत स्थळ आपल्यासमोर झळकते. तिथे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी शाळेसाठी लागणारे वेळापत्रक, वार्षिक नियोजन अभ्यासक्रम, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे विविध कोरे अर्ज, दाखले, प्रतिज्ञापत्रे, शाळेत वर्षभर राबविण्यासाठी विविध शालेय उपक्रम, परीक्षा, चाचण्या यांचे नमुने सरावासाठी प्रश्नपत्रिका, शालेय पोषण आहार, वार्षिक निकालपत्र, मूल्यमापन नोंदी यांची वापरण्यास अतिशय सोपे व महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पसंतीस उतरलेले आणि शिंदे यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर, साहित्याचा खजिना, महत्त्वाचे शासननिर्णय, शैक्षणिक घडामोडी असे बरेच काही उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला विभाग, संस्कारकथा, बोधकथा, गोष्टी, बालगीते, बडबडगीते, थोर पुरुषांची जयंती-पुण्यतिथी, मोबाईल, संगणक वापराची माहिती, उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र, जनरल नॉलेज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जीवन प्रेरणा आवर्जून वाचावेत असे लेख, कवितासंग्रह, नेहमी लागणारी संकेत स्थळे अशी भरगच्च माहिती या संकेत स्थळावर आहे.

देश-विदेशातील नेटीझन्सच्या उड्या !

परशुराम शिंदे या शिक्षकाने दि. ११ जून २०१७ रोजी निर्माण केलेल्या या संकेत स्थळावर नेटीझन्सनी अक्षरश: उड्या टाकल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह देशातून ७ लाख ११ हजार २१४, अमेरिकेतील ६४ हजार ७९३ जणांनी, तर इंडोनेशियातील ६९१६, जर्मनीतील २२३२, सिंगापूरमधील ९२४, रशियातील ७९४, चीनमधील ७५९, केनियातील ६१७, युनायटेड अरब अमिरातीमधून २५४, तर ब्राझिलमधून १९४ जणांनी भेट दिली आहे.


प्राथमिक शाळांसमोर अनेक आव्हाने आहेत. गुणवत्ता वाढावी, शिक्षकांना अध्ययन, अध्यापनात मदत होऊन त्यांचा वेळ वाचावा, कारकुन, शिपाई नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लागणारे अर्ज, तक्ते, सर्व साहित्य, माहिती यासाठी विनाखर्च मदत व्हावी आणि गुणवत्तेत वाढ होऊन खासगी शाळांकडे वळू पाहणारे विद्यार्थी, पालक जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळावेत, या एकमेव हेतूने संकेत स्थळाची निर्मिती केली.
- परशुराम शिंदे
उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठुळी
 

Web Title: On the teacher's website at Atpadi, Netsinjon will fly abroad and abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.