वसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:35 PM2018-11-17T16:35:57+5:302018-11-17T16:39:34+5:30

सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी केली.

Sudhir Mungantiwar will fund fund for Vasantdada memorial | वसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवार

वसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवार

Next
ठळक मुद्देवसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवारशासनाच्या उदासिनतेबद्दल वसंतदादाप्रेमींची नाराजी

सांगली : सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी केली.

वसंतदादा पाटील यांची १0१ वी जयंती सांगली येथे मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यानिमित्त मुनगुंटीवर यांनी कृष्णाकाठच्या वसंतदादा स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम उपस्थित होते.

वसंतदादा जन्मशताब्दीबाबत शासन आदेशानुसार काय काय झाले, विचारणा अशी चर्चा मुनगुंटीवार यांनी केली. त्यावर शैलजाभाभी पाटील, उदय पवार यांनी जन्मशताब्दीबद्दल शासनाने फक्त आदेश काढून समिती जाहीर केली, मात्र आजअखेर समितीची एक बैठकही घेण्यात आली नाही, असे सांगितले. त्यावर मुनगुंटीवार यांनी याबाबत खंत व्यक्त केली.

सांगली शहरातील वसंतदादा स्मारकाचे काम थोड्याच निधीसाठी रखडले असल्याचे सांगितल्यानंतर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

प्रस्ताव मिळाल्यानंतर लवकरात लवकर वसंतदादा स्मारकासाठीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. सांगलीतील हे एक चांगले प्रेरणादायी स्मारक होईल, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

 

Web Title: Sudhir Mungantiwar will fund fund for Vasantdada memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.