फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:40 AM2018-01-17T00:40:57+5:302018-01-17T00:41:19+5:30

आष्टा : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास व सोडायला तयार आहे. ऊस वगळता इतर पिकांची अवस्था वाईट आहे.

 Shetty-Jayantra group's ManoMilan Raju Shetty in Falkevadi: Ready to take over anybody for farmers, demand for seven-borrower | फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी

फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी

Next

आष्टा : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास व सोडायला तयार आहे. ऊस वगळता इतर पिकांची अवस्था वाईट आहे. शेतकरी आपली भूमिका इमाने-इतबारे पार पाडत असताना, त्याला हमीभाव मिळत नाही. त्याच्या कर्जबाजारीपणाला सरकारी धोरण कारणीभूत असल्याने शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

फाळकेवाडी (ता. वाळवा) येथे खासदार राजू शेट्टी यांच्या निधीतून नवीन गावठाणमधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन व ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाºयांच्या सत्कारप्रसंगी शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानीशेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, दिनकरराव इनामदार, गुंडाभाऊ आवटी, सयाजी मोरे जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, जनार्दन पाटील उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, सर्व व्यवस्था सडलेली आहे. २२ राज्यात फिरलो. सर्वत्र सामान्य शेतकरी, शेतमजूर यांची वाट लागली आहे. हरितक्रांतीनंतर अन्न-धान्य पिकू लागले. विक्रमी उत्पादन झाले, मात्र साठवणुकीसाठी गोदामे नसल्याने तातडीने विक्री करावी लागत आहे. ऊस शेती करताना आता साखरेच्या दरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शेतकरी दबावगट निर्माण झाला व शेतकरी एक झाला तर क्रांती होईल.

संभाजी कचरे म्हणाले, राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील हे शेतकºयांचे सर्वमान्य नेते आहेत. त्यांनी संघर्षापेक्षा समन्वयातून राजकारण करीत विकासाला गती द्यावी. जनाधार असलेले हे नेते एकत्र आले, तर तालुक्यातील स्वयंघोषित नेत्यांना त्यांची जागा दाखवू. यावेळी गुंडाभाऊ आवटी, सयाजी मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. ए. एम. पिरजादे यांनी स्वागत केले. बजरंग हाके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी फाळकेवाडीचे सरपंच शिवाजीराव आपुगडे, सुनीता आपुगडे, विजय मोरे, एस. आर. फाळके, दिनकर पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील उपस्थित होते.

दरात तडजोड नाही
खासदार राजू शेट्टी व आमदार जयंत पाटील गटाच्या पर्यायाने राष्ट्रवादी कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मनोमीलनबाबत शेट्टी म्हणाले, आम्ही एफआरपीपेक्षा कमी पैसे घेणार नाही. उसाच्या दरात तडजोड नाही. मैत्री ऊस दरापलीकडे नाही.

फाळकेवाडी (ता. वाळवा) येथे सरपंच शिवाजी आपुगडे, सुनीता आपुगडे यांचा सत्कार खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आला.

Web Title:  Shetty-Jayantra group's ManoMilan Raju Shetty in Falkevadi: Ready to take over anybody for farmers, demand for seven-borrower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.