...तर अमित शहांसमोर निदर्शने करू शरद शहा : सेवा कराच्या नोटिसा मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:06 AM2019-01-17T00:06:27+5:302019-01-17T00:08:27+5:30

मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून,

 Sharad Shah: Will demand to withdraw notice of service tax | ...तर अमित शहांसमोर निदर्शने करू शरद शहा : सेवा कराच्या नोटिसा मागे घेण्याची मागणी

केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी सांगलीच्या मार्केट यार्डात चेंबर आॅफ कॉमर्स व अन्य संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी निदर्शने केली.

Next
ठळक मुद्देगेल्या चार महिन्यांपासून सेवा कराच्या नोटिसांवरून आंदोलन सुरू आहे

सांगली : मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, तोपर्यंत नोटिसा मागे न घेतल्यास शहा यांच्यासमोर व्यापारी तीव्र निदर्शने करणार आहेत, असा इशारा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

जीएसटी कार्यालयाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसांच्याविरोधात गेल्या तीन दिवसांपासून मार्केट यार्डातील व्यापाºयांनी बेमुदत व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत व्यापाºयांची भूमिका ‘चेंबर’च्या पदाधिकाºयांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर मांडली.

शहा म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून सेवा कराच्या नोटिसांवरून आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही व्यापाºयांनी व्यापार बंद, निदर्शने करून, निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नाही. त्यामुळे सोमवारपासून व्यापाºयांनी आंदोलन सुरू केले आहे. लवकरच हळद व बेदाण्याचे नवीन हंगामातील सौदे सुरू होणार आहेत. व्यापार बंद राहिल्याने मार्केट यार्डातील सर्व घटकांबरोबरच शेतकºयांनाही नुकसान सोसावे लागणार आहे. व्यापाºयांनाही आंदोलन करण्यात स्वारस्य नसून नोटिसांवरून अस्वस्थता असल्यानेच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालून प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. तरीही नोटिसा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. २४ रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगलीत येणार असून, प्रसंगी त्यांच्यासमोरही व्यापारी तीव्र निदर्शने करणार आहेत. यावेळी ‘चेंबर’चे उपाध्यक्ष दीपक चौगुले, अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, हरीष पाटील, अण्णासाहेब चौधरी, रमणिक दावडीया उपस्थित होते.

पाच कोटींची उलाढाल ठप्प
मार्केट यार्डात दैनंदिन पाच कोटींची उलाढाल होत असते. व्यापाºयांच्या बंदमुळे ही उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष, सामाजिक, व्यापारी संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title:  Sharad Shah: Will demand to withdraw notice of service tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.