सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख

By admin | Published: March 21, 2017 01:24 PM2017-03-21T13:24:09+5:302017-03-21T13:24:09+5:30

उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांचे अर्ज दाखल

Sangram Singh Deshmukh by BJP for the post of Sangli District Council | सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख

Next


आॅनलाईन लोकमत

सांगली : शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांनी सोमवारी रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचा सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग मोकळा झाला.अध्यक्षपदासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांचा तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सत्यजित देशमुख यांचा तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी तीन वाजता निवड होणार आहे.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ३५ संख्याबळ असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी, अपेक्षित संख्याबळ गाठणार असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळवारी सांगलीत दिवसभर वेगवान राजकीय हालचाली झाल्या. पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील आदी उपस्थित होते. सोमवारी रात्री उशिरा पुन्हा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही जयंत पाटील यांनी स्वतंत्रपणे जिल्हा बँकेत चर्चा केली. शिवसेना आमदार अनिल बाबर यांनाही दोन्ही काँग्रेस नेत्यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.
दुसरीकडे भाजपची पोलिस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी करावयाच्या तडजोडींचे अधिकार संजयकाकांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संजयकाकांनी शिवसेना, घोरपडे गटाशीही चर्चा केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पदांचीही आॅफर दिली होती. भाजपला या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही बाबर यांना चचेर्ला बोलाविले. चचेर्चे हे गुऱ्हाळ रात्री उशिरा संपले. महाबळेश्वर येथे सहलीवर गेलेले भाजपचे २0 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. अध्यक्ष निवडीपूर्वी ते कोल्हापुरातून सांगलीत येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sangram Singh Deshmukh by BJP for the post of Sangli District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.