सांगलीत डोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:27 PM2018-04-18T14:27:58+5:302018-04-18T14:27:58+5:30

सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

On the Sangli head, with iron rod inserted, the youth's murder, elderly injured | सांगलीत डोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी 

सांगलीत डोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी 

ठळक मुद्देडोक्यात लोखंडी रॉड घालून तरुणाचा खून, वृद्धा जखमी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण

सांगली : सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आपटा पोलिस चौकीसमोरील श्री अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर प्लॅट नंबर पाचमध्ये हितेश हा आई कमलाबेनसह रहात होता. तो एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. मध्यरात्रीच्या सुमारास पारेख यांच्या फ्लॅट मध्ये खुनाचा प्रकार घडला.

यामध्ये हितेश पारेख यांच्या डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला, तर कमलाबेन यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजता कमलाबेनचा दुसरा मुलगा महेश हा त्यांच्या घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला.

त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पोमण यांनी घटनास्थळी धाव घेतली. हितेश व कमलाबेन यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे, उपअधिक्षक अशोक वीरकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. श्वानपथक अपार्टमेंटच्या सभोवतीच घुटमळले. या घटनेची माहिती मिळताच श्री अपार्टमेंटच्या आवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: On the Sangli head, with iron rod inserted, the youth's murder, elderly injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.