दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:20 PM2018-04-17T16:20:45+5:302018-04-17T16:20:45+5:30

अकोला: दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीदरम्यान फतेह चौकाजवळून अटक केली.

Gangs of robbers arested; Desiqatta, lively cartridge, knife seized | दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त

दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त

Next
ठळक मुद्देचांदेकर चौक ते फतेह चौकादरम्यान एमएच ३0 एए ६९६४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षामध्ये बसून चौघे जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पथकाला दिसून आला. पथकातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे जण सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून आॅटोरिक्षासह देशी कट्टा, जीवंत काडतूस, चाकू व लोखंडी पहार जप्त केली.


अकोला: दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीदरम्यान फतेह चौकाजवळून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक देशीकट्टा, एक जीवंत काडतूस आणि एक चाकू जप्त केला. अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार अनिल जुमळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली.
कोतवाली पोलिसांचे पथक रात्री गस्त घालीत असताना, चांदेकर चौक ते फतेह चौकादरम्यान एमएच ३0 एए ६९६४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षामध्ये बसून चौघे जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पथकाला दिसून आला. पथकातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यावर आरोपींनी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौघांची झडती घेतली. दरम्यान आरोपी राजु मधुकर हिवराळे(रा. अनंत नगर जुने शहर) याच्याकडून एक देशीकट्टा व एक जीवंत काडतूस(किंमत ५ हजार रूपये) आढळून आले. आरोपी अनिल उत्तम रताळ(रा. आंबेडकर नगर) याच्याकडून धारदार चाकू व लोखंडी पहार आढळून आली. त्यांच्यासोबत अमोल डिगांबर पवार(रा. संजय नगर लहान उमरी हा होता. आॅटोरिक्षा चालक पंकज धनंजय दिघेकर(रा. अकोट फैल) हा त्यांना घेवून जात होता. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून आॅटोरिक्षासह देशी कट्टा, जीवंत काडतूस, चाकू व लोखंडी पहार जप्त केली. आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३९८, सहकलम ३/२५ आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पथकातील एएसआय जगदिश जायभाये, अनिल धनभर, प्रमोद डुकरे, विपुल सोळंके, ज्ञानेश्वर रडके, यशोधन जंजाळ, नागसेन वानखडे, अमित बोळे यांनी केली.

काडतूस टाकले पोलिसांच्या गाडीत
पोलिसांनी आरोपींचा आॅटोरिक्षा पकडल्यानंतर, झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपींकडे देशीकट्टा आढळून आला. काडतूस कुठे आहे. असे विचारल्यावर आरोपींनी माहिती दिली नाही. आरोपी राजु हिवराळे याने पोलिसांना काडतूस दिसू नये. यासाठी जीवंत काडतूस पोलिसांच्याच गाडीत टाकून दिले. परंतु पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने पोलिसांच्या गाडीत फेकून दिलेले काडतूस दाखविले.

 

Web Title: Gangs of robbers arested; Desiqatta, lively cartridge, knife seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.